मुलच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपाला साथ द्या! – आमदार सुधीर मुनगंटीवार
मुल नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या उमेदवार किरणताई कापगते यांचा अर्ज दाखल

चांदा ब्लास्ट
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत अर्ज सादर
मुलमध्ये झालेला सर्वांगीण विकासाची अनुभूती मुलवासियांनी घेतली असून ही विकासयात्रा अखंडित सुरू ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला मुलच्या जनतेने आशिर्वाद देणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असल्याने विकासाच्या निर्णयांना आणि योजनांना आणखी गती मिळत असून, मी आमदार म्हणून बल्लारपूर मतदारसंघाच्या सर्वांगीण सेवेसाठी कटिबद्ध आहे. भाजपाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले तर मुलचा विकास थांबणार नाही, उलट अधिक वेगाने पुढे जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुल नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या उमेदवार किरणताई कापगते यांनी 17 नोव्हेंबर रोजी उमेदवार अर्ज दाखल केला तसेच सर्व प्रभागातील उमेदवारांनीही आपले अर्ज सादर केले. यावेळी आ.मुनगंटीवार बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष चंदू मारगोनवार, शहर अध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, नंदकिशोर रणदिवे, अजय गोगुलवार, प्रभाकर भोयर, रत्नमाला भोयर, चंद्रकांत आष्टणकर, मोती टहलियानी, सुरेश पाटील ठिकरे, हनुमान काकडे, महेंद्र करकाडे आदी उपस्थित होते.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मुलच्या जनतेने आजपर्यंत विकासावर विश्वास ठेवून पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळेच मुलचे चित्र बदलू शकले आहे. रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य सुविधा, उद्यानांची निर्मिती, सौंदर्यीकरण, पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांत जे बदल झाले, ते जनतेच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाले.
मूल येथे मुख्य रस्ता, कर्मवीर मा.सा. कन्नमवार सभागृह, तहसील कार्यालय, पंचायत समितीची इमारत, पाणीपुरवठा योजना, स्टेडियम, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, इको पार्क, स्विमिंग टॅंक, आठवडी बाजार असे विविध विकासकामे तालुक्यात झाली. 100 खाटांच्या मुल उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता मिळाली, कामं प्रगतीपथावर आहे. सोमनाथ येथे भव्य कृषी महाविद्यालय उभे राहत आहे. नुकतीच मुल येथील पॉलिटेक्निक कॉलेजला मान्यता मिळाली आहे तसेच मुलींसाठी शुरवी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. सातत्याने पाठपुरावा करत मुल तालुक्याचा चेहरामोहरा बदलला आहे, असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
आ.मुनगंटीवार पुढे म्हणाले, आता ही गती कायम ठेवण्यासाठी आणि मुलला अधिक सक्षम, आधुनिक आणि समृद्ध शहर बनवण्यासाठी येथील मतदार निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहतील. कारण विकास थांबू नये, स्वप्ने अपूर्ण राहू नयेत आणि प्रत्येक नागरिकाचा आवाज सन्मानाने ऐकला जावा यासाठी भाजपाच सक्षम आहे. त्यासाठी मुलवासीय जनता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना आशीर्वाद देतील असा ठाम विश्वास आहे.
यावेळी मूल नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून सौ. किरण किशोर कापगते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नगरसेवक पदासाठी भाजपा उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक-1(अ) अनुसूचित जमाती (महिला) पदाकरिता सौ. संजना रवींद्र मडावी, प्रभाग क्रमांक-1 (ब) (सर्वसाधारण) अजय गोगुलवार, प्रभाग क्रमांक-2 (अ) (नामाप्र महिला) सौ. अश्विनी रुपेश निकोडे, प्रभाग क्रमांक-2(ब) ( सर्वसाधारण) सुरज रमेश मांदाडे, प्रभाग क्र.3 (अ) (ओबीसी महिला) सौ. आचल किशोर चोखुंडे, प्रभाग क्र.-3 (ब) (सर्वसाधारण) प्रशांत रामचंद्र बोभाटे, प्रभाग क्रमांक- 4 (अ) (नामाप्र सर्वसाधारण) अनिल भाऊराव साखरकर, प्रभाग क्र.4 (ब) (सर्वसाधारण महिला) लिनाताई अनिल बद्देलवार, प्रभाग क्र-5 (अ) (नामाप्र महिला) प्राची आनंद अाक्केवार, प्रभाग क्रमांक-5(ब) (सर्वसाधारण) जितेंद्र टिंगुसले, प्रभाग क्र.6 (अ) (नामाप्र सर्वसाधारण) नंदकिशोर मुरलीधर रणदिवे, प्रभाग क्रमांक 6( ब) (सर्वसाधारण महिला) सौ. आशा मनोहर गुप्ता, प्रभाग 7- (अ) (अनुसूचित जमाती) झकास भगवान कुमरे, प्रभाग 7-(ब) (सर्वसाधारण महिला) माधुरी महेंद्र करकाडे, प्रभाग -8 (अ) (अनुसूचित जाती सर्वसाधारण) मिलिंद राजाराम खोब्रागडे, प्रभाग 8( ब) (सर्वसाधारण महिला) अपर्णा गुरुदास भेंडारे, प्रभाग 9 (अ) ( अनुसूचित जाती महिला) सौ. पूजाताई जपाण रामटेके, प्रभाग 9 (ब) (सर्वसाधारण) प्रशांत लाडवे, प्रभाग- 10 (अ)( अनुसूचित जाती महिला) सौ.बिंदू विलास जुमडे, प्रभाग 10-(ब)(सर्वसाधारण) श्री निलेश रायकंटीवार आदी उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल केले.



