ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामीण रुग्णालयातील 6 बॅटरीची चोरी

संशयित आरोपीं विरोधात गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे 

 देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालय मधील ट्रामा केअर सेंटर इमारती चे कुलुप तोडुन आत मध्ये प्रवेश करुन आतमध्ये लावण्यात आलेल्या इन्वर्टर च्या INVARED TALL TUBVLAR कंपनीच्या 06 बॅटरी प्रत्येकी किंमती अंदाजे 15,000/-रु ची अशी एकूण 90,000/-रु. च्या बॅटरी हया रुग्णालय चे पाठीमागे राहणारा मोतीसिंग बावरे व त्याचे सोबत राहणारे यांनी चोरून नेल्याची घटना 15 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली.

सिक्युरिटी गार्ड संजय किसन लोखंडे यांनी आज सकाळी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित आरोपीं मोतीसिंग बावरे व इतर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस सहाय्यक फौजदार नारायण गीते करीत आहे . पोलिस उप निरीक्षक दत्ता नरवाडे यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये