ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदेवाही तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

विधीमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

चांदा ब्लास्ट

काॅंग्रेस विधीमंडळ पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांचा विकासात्मक दृष्टिकोन, मतदार संघातील नागरिकांप्रती असलेली तळमळ, आणि शासन स्तरावर सतत पाठपुरावा करण्याचा दीर्घ अनुभव यामुळे आजवर ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात कोट्यावधींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून अत्यंत गरजेची व लोक उपयोगी कामे पूर्णत्वासही आली आहेत. सदर क्षेत्राचा ना भूतो न भविष्यती असा विकास साधण्यात काॅंग्रेस विधीमंडळ पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार सदैव अग्रेसर ठरले असून त्यांनी आपल्या विकास कामांचा झंजावात कायम राखत सिंदेवाही तालुक्यात विविध विकासकामे मंजूर करवून घेतली आहेत. या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला आहे.

आज भूमिपूजन सोहळा पार पडलेल्या विकास कामांमध्ये सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे (१५ लक्ष), नवरगाव येथे माळी समाज मंदिर परिसरात संरक्षण भिंत बांधकाम व पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचे भूमिपूजन (२० लक्ष), नवरगाव येथील धुमणखेडा प्रभागात माता मानिका देवी मंदिर परिसरात चावडी बांधकामाचे भूमिपूजन (१५ लक्ष), मिनघरी येथे श्री गुरुदेव सामाजिक सभागृहाचे लोकार्पण (३५ लक्ष), वाकलं येथे महात्मा फुले सभागृहाचे लोकार्पण (३५ लक्ष), व माळी समाज सभागृहाचे बांधकामाचे भूमिपूजन (१५ लक्ष), मोहाडी येथे सार्वजनिक अभ्यासिका बांधकामाचे भूमिपूजन ( ३५ लक्ष) आदी विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमाकांत लोधे, माजी नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, सरपंच संघटना अध्यक्ष राहुल बोडणे, संजय गहाणे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयश्री नागापुरे (कावळे), जानकीराम वाघमारे,मंगेश मेश्राम, सचिन सहारे, अक्षय पेटकुले , सुशांत बोडणे,यांसह आयोजित विकास कामे लोकार्पण व भूमिपूजन पार पडलेल्या ग्राम पंचायतिचे सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये