सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात धरती आबा जननायक बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले, कनिष्ठ महाविद्यालयात गडचांदूर येथे दिनांक 15 नोव्हेंबर रोजी धरती आबा जननायक बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेला पुष्ममाला अर्पण अभिवादन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आले त्या निबंध स्पर्धेचे विषय *बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आजच्या भारतात उपयोग* त्यात विद्यार्थ्यांनी भरभरून सहभाग घेतला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री महेंद्र कुमार ताकसांडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. नितीन सुरपाम व डॉ. प्रा. राजेश बोळे उपस्थित होते याप्रसंगी जयंती निमित्त मार्गदर्शकांनी आपले विचार व्यक्त केले दैनंदिन जीवनामध्ये बिरसा मुंडा यांचे विचार आजच्या तरुणांनी अंगीकारले पाहिजे असे महत्त्व पटवून दिले
सदर कार्यक्रमाचे संचालन प्रा. अनिल मेहरकुरे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. जयश्री ताजणे यांनी केले कार्यक्रमासाठी प्रा.अशोक सातारकर प्रा. जहीर सय्यद प्रा. नितीन टेकाडे प्रा.प्रवीण डफाडे प्रा. कु. शिल्पा कोल्हे व शिक्षकेतर कर्मचारी करण लोणारे सिताराम पिंपळशेंडे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.



