ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना तालुक्यात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव

बळीराजा शेतकरी परिषदेकडून तहसीलदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 हेक्टरी पन्नास हजार मदतीची मागणी

  परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले सोयाबीन धान पीक हिरावून घेतले. आता पुन्हा एक नवीन संकट शेतकऱ्यांवर आले आहे कापसाच्या पिकावर लाल बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडल्याने तहसीलदार कोरपणा यांना निवेदनातून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीची मागणी बळीराजा शेतकरी परिषद कोरपना यांनी केली आहे.

         या वर्षी सततच्या पावसामुळे शेतकरी ओल्या दुष्काळामुळे हैरान झाले आहेत. परतीच्या पावसाने मात्र ऐन पीक काढणीच्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने शासनाने तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे आणि आता कापसाच्या पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

तब्बल पाच ते सहावेळा फवारणी करून देखील बोंड अळीचा प्रार्दुभाव कमी होत नसल्याने, याचा मोठा फटका पिकाला बसला आहे. कोरपना तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे. त्यामुळे संबंधित विभागाने त्वरीत नुकसानाचे पंचनामे करावेत आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करावी अशी मागणी कोरपना तालुक्यातील शेतकरी किशोर निब्रड ज्ञानदीप बेरड हरिदास गौरकर साहेबराव घुगुल यादव निब्रड श्रीराम पाचभाई विलास सोयाम श्यामल विटकर विनोद नागोसे प्रभाकर गेडाम मोहन पावडे रामदास खेरवटकर यांनी केली आहे यावेळी बहुसंख्येने शेतकरी हजर होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये