ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नगर परिषद निवडणूकित काँग्रेस, शिवसेना उबाठा व वंचित बहुजन आघाडी यांची युती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर नगर परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ने काँग्रेस व शिवसेना ऊ बा ठा सोबत युती करून निवडून लढविणार असल्याची घोषणा 15 नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश तावाडे यांनी गडचांदूर येथे केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक हितेंद्र मडावी, जिल्हा उपाध्यक्ष दिव्यकुमार बोरकर, रुपचंद निमगडे,जिल्हा महासचिव मधुकर उराडे, कोरपना तालुका सल्लागार धनराज चांदेकर तथा काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.



