ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र, जिवंत काडतुस पोलिसांच्या ताब्यात

एकुण ९० हजार २०० रूपयेचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक १६/११/२०२५ रोजी स्थानीक गुन्हे शाखेचे पथक मा. पोलीस निरीक्षक सा. स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांचे आदेशाने उप विभाग वर्धा परीसरात अवैध्य व्यवसायावर कार्यवाही करने करीता तसेच रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करणे करीता पेट्रोलींग करीत असतांना मुखबीर कडुन गोपनीय माहीती प्राप्त झाली की, “रेकॉर्ड वरील गुन्हेगार नामे – अमोल वंजारी रा. धंतोली, वर्षा हा इतवारा पोलीस चौकी समोर, वर्धा येथे त्याचे जवळ अवैधरीत्या अग्निशस्त्र (देशी कट्टा) बाळगुन कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे बेतात आहे.”

अशा माहीती वरून स्थानीक गुन्हे शाखेचे पथक हे इतवारा पोलीस चौकी समोर, वर्धा येथे गेले असता माहीती प्रमाणे अमोल यशवंत वंजारी, वय ३१ व, राहणार वार्ड कमांक १८, धंतोली, वर्धा हा पोलीसांना पाहुन पळुन जात असतांना त्यास ताब्यात घेवुन त्यास विचारपुस केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडती मध्ये खबरे प्रमाणे कमरेला पॅन्टचे मागील बाजुने एक स्टिलच्या धातु सारखे दिसणारे सिल्व्हर रंगाचे देशी बनावटीचे अग्निशस्त्र मॅगझिनटिगर सह मिळुन आल्याने त्याचे मॅगझीन काढुन पाहणी केली असता त्या मध्ये एक जिवंत काडतुस असलेले दिसुन आले ते ताब्यात घेवुन त्यास सदर अग्निशस्त्र बाळगण्याबाबत पासपरवाना विचारले असता.,

त्याने त्याचे जवळ कोणताही पासपरवाना नसल्याचे सांगीतले. त्यावरून त्याचे ताब्यातुन १) एक स्टिलच्या धातु सारखे दिसणारे सिल्व्हर रंगाचे देशी बनावटीचे अग्निशस्त्र मॅगझिनट्रिगर सह अंदाजे किंमत ५०,०००/- रू, २) एक पितळी जिवंत काडतुस (राउंड) किंमत १००/-रु, ३) एक मोटोरोला कंम्पनीचा अॅन्ड्राईड मोबाईल किंमत १०,०००/-रु, ४) एक बजाज कंम्पनीची प्लॅटीना सिल्व्हर ग्रे रंगाची मोटर सायकल ज्यावर क्रमांक एम.एच. ३२ एल ४६५६ जुनी वापरती किंमत ३०,०००/- रु असा एकुण जु. किंमत – ९०,२००/- रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदया प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

-सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनी. राहुल इटेकार, पोलीस अंमलदार अमर लाखे, अमरदिप पाटील, चंद्रकांत बुरंगे, धमेंद्र अकाली, पवन पन्नासे, रितेश कुऱ्हाडकर, सर्व नेमणुक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा. यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये