जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी देऊळगाव राजा येथे निवडणूक कार्याचा घेतला आढावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ. किरण पाटील, जिल्हाधिकारी,बुलढाणा व श्री सदाशिव शेलार निवासी जिल्हाधिकारी बुलढाणा महोदयांनी देऊळगाव राजा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर विविध निवडणूक कार्यांची सविस्तर पाहणी केली.
या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सुरेश थोरात, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुप्रिया चव्हाण, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली डोगरजाळं तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मा. जिल्हाधिकारी यांनी महत्वपूर्ण ठिकाणांची पाहणी केली व आवश्यक निर्देश दिले:
नामनिर्देशन कक्ष – उमेदवारांच्या सोयीची व्यवस्था, सुयोग्य काउंटर, मार्गदर्शक फलकांची स्थिती तपासली. छाननी कक्ष -छाननीसाठी आवश्यक कागदपत्रे, बसण्याची व्यवस्था, स्टाफची उपलब्धता पाहिली.
मतदान साहित्य वितरण कक्ष – मतदानाच्या दिवशी साहित्य वितरणाची सुयोग्य व वेळेवर होणारी तयारी सुनिश्चित करण्याचे निर्देश. दिले. स्ट्रॉंग रूम – सुरक्षा व्यवस्था, CCTV, प्रवेश नियंत्रण व 24×7 पोलिस बंदोबस्त तपासला. EVMप्रशिक्षण हॉल – मतदान कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची स्तर तपासणी व ‘हॅण्ड्स ऑन’ प्रशिक्षणावर भर देण्याचे निर्देश दिले
अनामत जमा कक्ष (Deposit Counter) – उमेदवारांना कोणतीही अडचण येऊ नये याबाबत सूचना दिल्या
मतदान केंद्रांची प्राथमिक तपासणी – मूलभूत सुविधा, दिव्यांग सुलभता, पिण्याचे पाणी व शौचालयांची स्थिती आढळून आली.
यावेळी मा. जिल्हाधिकारी यांनी सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता व वेळेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले.



