ब्रेकिंग न्यूज _ असंतुष्ट सुनील नामोजवार यांचा भाजप शहर अध्यक्षपदाचा राजीनामा
भद्रावतीत राजकीय ऊलथापालथ!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहराचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे शहर अध्यक्ष सुनील नामोजवार यांनी नगराध्यक्ष पदाच्या ऊमेदवारीवरुन असंतुष्ट होत शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने भाजप तथा शहरातील राजकारणात मोठी खळबळ ऊडाली आहे.भाजप सदस्य म्हणुन ते कायम असले तरी आपण अद्याप पुढचा निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र ते कांग्रेसच्या वाटेवर असल्याची जबरदस्त शहरातील राजकारणात आहे.प्रारंभी भाजप नगराध्यक्ष पदाच्या ऊमेदवारीसाठी सुनील नामोजवार हे दावेदार समजल्या जात होते.मात्र अनील धानोरकरकरांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर नामोजवार यांची ऊमेदवारी डळमळीत झाली होती.त्यांनी भाजपकडे नगराध्यक्षपदासाठी ऊमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र अनील धानोरकर यांची ऊमेदवारी जवळपास भाजपकडून निश्चीत झाल्यानंतर ऊमेदवारीवरुन असंतुष्ट असलेल्या सुनील नामोजवार यांनी अखेर भाजप शहर अध्यपदाचा राजीनामा दिला.
ते कांग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या शहरात आहे.का़ग्रेसकडून त्यांना ऊमेदवारी मिळाल्यास अनील धानोरकर विरुद्ध सुनील नामोजवार असा सामना भद्रावतीकरांना पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे.



