ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनपा निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी

पहिल्याच दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात १४२ उमेदवारांनी दाखल केली आवेदनपत्रे

चांदा ब्लास्ट

आगामी चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुकांसंदर्भात इच्छुक उमेदवारांनी निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात आज (रविवार) पासून आवेदनपत्रे दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तब्बल १४२ उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत आपली आवेदनपत्रे दाखल केली.

चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असून, आजवर प्रभागांमध्ये सातत्याने जनसंपर्क ठेवत नगरसेवक होण्याची तयारी दर्शविणारे अनेक इच्छुक आता पक्षाचा पाठिंबा मिळविण्यासाठी सक्रिय झाले आहेत. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांची अधिक पसंती दिसून येत आहे.

चंद्रपूर महानगर निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आजपासून निशुल्क आवेदनपत्र स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली असून, २१ नोव्हेंबरपर्यंत आवेदनपत्रे स्वीकारली जाणार आहेत. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी कार्यालयात गर्दी केली होती. आज रविवारी १४२ इच्छुक उमेदवारांनी आवेदन पत्र दाखल करत भारतीय जनता पक्षाच्या टिकिटावर निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये