ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने कर्मयोगी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचा सत्कार 

राष्ट्रसंतांचा मानवतावादी विचार सर्वदूर पोहचविण्यासाठी डॉ. कुंभारे यांचे योगदान मोठे - चंदू पाटील मारकवार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रा. अशोक डोईफोडे

     गडचिरोली जिल्ह्यातील थोर समाजसेवी व्यक्तिमत्व,विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थाचे मार्गदर्शक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ज्येष्ठ अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांना त्यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

    श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या मुख्य शाखेत आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श गाव राजगड चे शिल्पकार चंदू पाटील मारकवार होते . ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, अरविंद पाटील वासेकर, माजी प्राचार्य पंडित पुडके, दलितमित्र नानाजी वाढई ,दामोधर बोरकुटे, राजाभाऊ सोनटक्के, ज्येष्ठ प्रचारक केशवराव दशमुखे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विलास निंबोरकर, सायकल स्नेही मंडळाचे उपेंद्र रोहणकर, सुखदेव वेठे,अनिल धात्रक, सुरेश मांडवगडे, डॉ. अनंता कुंभारे, प्रमोद वैद्य, नत्थूजी चिमुरकर, मारोतराव उईके,कमलकिशोर खोब्रागडे,

 प्रकाश ताकसांडे, प्रमोद हेमके घनश्याम जेंगठे,  जिल्हा प्रचारक भाऊराव पत्रे, एड.बांगरे आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी चंदू पाटील मारकवार म्हणाले, डॉ. कुंभारे यांनी आदिवासी दुर्गम भागात राष्ट्रसंताच्या विचारांचा व्यापक प्रचार व प्रसार केला, अनेकांना आधार दिला.तर बंडोपंत बोढेकर म्हणाले की, डॉ. कुंभारे हे राष्ट्रसंताच्या विचारांचे मूर्तीमंत उदाहरण आहे.त्यांनी ग्रामगीतेतील सेवाभाव जनमानसात रुजवला. प्रास्ताविक पंडित पुडके यांनी केले तर आभार प्रदर्शन अरविंद पाटील वासेकर यांनी केले. सूत्रसंचालन पंकज भोगेवार यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये