स्वावलंबी नगरात श्रीगुरुदेव भजन संध्या संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने स्वावलंबी नगरात नुकताच कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने राष्ट्रसंत रचित श्री गुरुदेव भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन तसेच मान्यवरांचे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते तर पत्रकार प्रकाश चांभारे, सौ. रेखा चांभारे, रजनी बोढेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजमाता राणी हिराई महिला भजन मंडळाचे अध्यक्ष श्रीमती गीता अत्रे, बंडू टेकाम गुरूजी, रघुनाथ निमकर, सौ. कविता टेकाम,सौ. शारदा निकुरे, संजय बोढाले, वासुदेव चटारे, कु. तनिष्का टेकाम, विलास माकोडे, अजिंक्य घाटे, आशिष निकुरे आदींनी भजनांचा कार्यक्रम सादर केला.
राणी हिराई महिला भजन मंडळाच्या वतीने भजन गायक रघुनाथ निमकर (देवाडा), वासुदेव चटारे, हरिश्चंद्र निकुरे यांचा सपत्नीक शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक बंडू टेकाम गुरूजी यांनी केले. सूत्रसंचालन तन्मय टेकाम यांनी केले तर आभार गीता अत्रे यांनी केले.



