वंदे मातरम् – १५० वर्षपूर्ती सोहळ्यात समर्थ कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
“सुजलां सुफलां मलयजशीतलाम्, शस्यशामलाम् मातरम्। वन्दे मातरम्!”
या देशभक्तिप्रेरक घोषवाक्याने दुमदुमलेल्या वातावरणात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्षपूर्ती निमित्ताने भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई ,कुलसचिव डॉ. ठाकरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ.काळपांडे , सहयोगी अधिष्ठाता डॉ. भोयर, तांत्रिक सचिव डॉ.नितीन कोष्टी , डॉ.किशोर बिडवे तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांमध्ये समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. विजेत्यांना मा.कुलगुरूंच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
निबंध लेखन स्पर्धा:
प्रथम क्रमांक – साक्षी पंढरी तिखे
द्वितीय क्रमांक – संकल्प संतोष
भुतेकर ,रील स्पर्धा:
प्रथम क्रमांक – सोनाली भरत टाले
द्वितीय क्रमांक – प्रतीक्षा संतोष सुरडकर
लोगो डिझाईन स्पर्धा:
प्रथम क्रमांक – शीतल गणेश वाघमारे
द्वितीय क्रमांक – श्रुतीका प्रविण इवळकर
कविता लेखन स्पर्धा:
प्रथम क्रमांक – आकाश विष्णू मुटकुले
द्वितीय क्रमांक – अंजली नितीन वायाळ
या सर्व अभिनंदन करण्यात आले
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे, डॉ. रोहित तांबे, बोबडे, डॉ.नितीन मेहेत्रे यांच्या अथक परिश्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले.
डॉ. पी.डी.के.व्ही. अकोला विद्यापीठाचे “नवोन्मेष आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्याचे कार्य” नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.



