ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे बालदिना निमित्य रंगला आनंदाचा उत्सव

चांदा ब्लास्ट

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्य दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी चांदा पब्लिक स्कूल मध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे, प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे, पुर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात पंडित नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलना सोबतच शिक्षकांद्वारा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभसंदेश देऊन करण्यात आली.

या प्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी स्वागत गीत, सामूहिक गीत, समूह नृत्य, कविता व शिक्षणावर आधारित कव्वाली चे उत्कृष्टपणे सादरीकरण केले. पूर्व प्राथमिक विभागातही छोट्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकांनी शिक्षणावर आधारित नाटका-सोबतच, मुक अभिनय आणि इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे प्रस्तुतीकरण केले.

शिक्षिका जास्मिन हकिम, सुरेखा उमरे यांनी उपस्थित सर्वांना बालदिनाचे महत्त्व सांगितले. बालदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे सहभाग नोंदविला.

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी बालदिनाच्या शुभेच्छा देत प्रत्येक मूल हे देवाचे देणं आहे, त्यांच्या चेह-यावरचे हास्य कायम ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सदगुण, आदर आणि सहकार्य यांचा स्वीकार करावा असे सांगितले.

शाळेच्या प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे ह्यांनी सर्वांना बालदिनाच्या शुभेच्छा देत बालक हे राष्ट्राचे भविष्य आहेत. त्यांच्या शिक्षण संस्कार आणि विकासासाठी प्रत्येक शिक्षकाने जबाबदारीने प्रयत्न करणे आवश्यक आहे असे वक्तव्य केले आणि पंडित नेहरूंचे बालप्रेम, त्यांचे विचार आणि बालकांविषयी असलेले प्रेमळ दृष्टीकोन याबद्दल सर्वांना प्रेरित केले.

कार्यक्रमाचे संचालन शिक्षक फहिम शेख, रेवती बडकेलवार, दुर्गा जोरगेवार यांनी तर आभार प्रदर्शन कुलदिप मेश्राम, सुषमा बेरड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम प्रमुख जास्मिन हकिम, पुर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे, समन्वयक निलिमा पाऊणकर, वासवी राधाराम, रोशना हजारे, कांचन यादव, श्वेता बहादे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये