आत्मनिर्भर भारतासाठी “सहकार” हे माध्यम महत्वाचे _ मा.श्री. राजेश्वर भि. कल्याणकर
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने दि.१४ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ७२ वा अखिल भारतीय सहकार सप्ताह साजरा करण्याकरिता दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी बँकेचे प्र.का. चंद्रपूर येथे सहकार ध्वजारोहण बँकेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.राजेश्वर भि.कल्याणकर यांच्या शुभहस्ते झाले असून उपस्थित असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्याना मार्गदर्शन करतांना मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.श्री.राजेश्वर भि. कल्याणकर म्हणाले कि, “सहकार हे समाज मजबुतीचा पाया आहे, प्रगतीचा राजमार्ग आहे, आत्मनिर्भर भारतासाठी सहकार हे माध्यम महत्वाचे आहे”.
या वेळी प्रशासन व मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक श्री.एम.बी.बुरांडे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापक श्री. राज दर्वे, कर्ज व अग्रीम विभागाचे व्यवस्थापक श्री.डी.एन. खिरटकर, ऑडीट विभागाचे व्यवस्थापक कु.उज्वला नागापुरे, हिशोब व बँकिंग विभागाचे व्यवस्थापक श्री. उरकुडे व इतर अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.



