सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने पंडित नेहरू व लहुजी साळवे यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, जनसेवा सामाजिक संघटना, स्व भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, जेष्ठ नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांची जयंती विरंगुळा भवन आठवडी बाजार परिसर येथे साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.गोविंदराव अहिरे होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शांतारामजी निरफळे, प्रा विनायकराव कुळकर्णी, प्रा.विजय रायमल, धनसिंग शिपणे,प्रा.प्रदीप मिनासे,प्रकाश खांडेभराड, बळीराम मापारी, रामदास कुलथे,मार्तंड आप्पा घिके, मधुकर धुळे, श्री.पंडितराव पाथरकर, उपस्थित होते, सर्वप्रथम पंडित नेहरू व लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मान्यवरांनी पंडित नेहरू व लहुजी साळवे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, कार्यक्रमाचे संचालन श्री.प्रकाश अहिरे यांनी केले तर सर शेवटी आभार प्रदर्शन श्री गोविंद बोरकर यांनी केले.



