ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सायबर गुन्हे जनजागृतीविषयी मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, वर्धा यांच्या तर्फे नागरी, ग्रामीण बिगरशेती व सेवक पतसंस्थांसाठी सायबर गुन्हे जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन विद्यादिप रेसिडंन्सी हॉटेल, वर्धा येथे करण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण १७० कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांना सध्या वाढत चाललेल्या विविध ऑनलाइन फसवणुकींच्या पद्धती, विशेषतः बँक फ्रॉड, डिजिटल अरेस्ट, तसेच पतसंस्थेशी संबंधित सायबर फसवणूक प्रकरणे (केस स्टडी) याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून सहा. पोलीस निरिक्षक अशिष चिलांगे, अंकित जिभे आणि स्मिता महाजन (सायबर सेल, वर्धा) यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष घडलेल्या प्रकरणांच्या उदाहरणातून सायबर सुरक्षा उपाययोजनांचे महत्त्व अधोरेखित केले आणि फसवणुकीपासून वाचण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाय सांगितले.

कार्यक्रमाद्वारे पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांना डिजीटल व्यवहार करताना दक्षता बाळगण्याचे, संशयास्पद लिंक, कॉल किंवा अॅप्लिकेशनपासून सावध राहण्याचे तसेच नागरिकांना सायबर गुन्ह्याबाबत जागरूक करण्याचे आवाहन करण्यात आले.

या प्रशिक्षणामुळे पतसंस्थांमधील कर्मचारी सायबर सुरक्षेचे मूलभूत ज्ञान प्राप्त करून भविष्यातील आर्थिक फसवणुकीपासून बचाव करू शकतील, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये