ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विविध कार्यक्रमाने हंसराज भैय्या अहीर यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान शिबीर, रूग्णांना चष्मे वाटप, परिचारीका सत्कार व अन्य सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजभैय्या अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांनी दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून वाढदिवस साजरा केला.

           चंद्रपुरात भाजपा, भाजयुमो, महिला आघाडी व अन्य आघाड्यांच्या वतीने शनि मंदिर, पांढरकवडा येथील हनुमान मंदिर तसेच वढा येथे पुजा-अर्चना करून त्यांच्या दीर्घायुष्याकरिता सामुहिक प्रार्थना केली. लालपेठ येथील श्यामाप्रसाद मुखर्जी शाळेत आमदार किशोर जोरगेवार यांच्या शुभहस्ते आरोग्य व नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन पार पडले. 600 रूग्णांना शिबिर स्थळी चष्मे वाटप करण्यात आले.लोकमान्य टिळक कन्या प्राथ. शाळा व म.ज्योतिबा फुले शाळेमध्ये व शहरातील अन्य शाळांमधील विद्यार्थ्यांना नोटबुक्स व पेनचे वितरण करण्यात आले. बंगाली कॅम्प तसेच अष्टभुजा व रमाबाई नगर येथे मसाला भात वितरण केले.

        सफाई कामगारांचा सत्कार सेफ्टी किट भेटवस्तुंचे वितरण, महाकाली वार्डातील चंडिका माता मंदिर येथे भव्य रक्तदान शिबीर, लाडक्या बहिनींची ई-केवायसी, बाबुपेठ येथे बचतगट महिला व आधार केंद्रातील निराधार महिलांना गृहपयोगी साहित्य वाटप, जटपुरा येथे युवा मोर्चा द्वारा दुध वाटप, ओबीसी मोर्चाद्वारे जोडदेऊळ येथे महाआरती व लाडू वाटप, डेबु सावली येथे वृध्द बांधवांना साहित्य वितरण, सामान्य रूग्णालयातील रूग्णांना दुध व फळ वितरण, बाबुपेठ येथे 80 परिचरीकांचा सत्कार व गौरव, प्यार फाऊंडेशन येथे मुक्या प्राण्यांना खाद्य वाटप, आशा वर्कर्सचा सत्कार, काशी विश्वनाथ मंदिरात सुंदरकांड आदी कार्यक्रम संपूर्ण दिवसभर आयोजित करण्यात आले.

वरील सर्व कार्यक्रमास माजी उपमहापौर अनिल फुलझेले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर व अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देवून आयोजकांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता तुषार सोम, विनोद खेवले, नामदेव डाहुले, विनोद शेरकी, दिनकर सोमलकर, मयुर भोकरे, मयुर हेपट, प्रा.रवि जोगी, अक्षय शेंडे, राम हरणे, शाम कनकम, स्वप्निल डुकरे, अॅड. सारीका संदूरकर, मुग्धा खांडे, राजेश वाकोडे, स्वप्निल मुन, रामकुमार आकापेल्लीवार, पुष्पा उराडे, सुवर्णा लोखंडे, सायली येरणे, कौसर खान, भाग्यश्री हांडे, उमेश एैलू, सुदामा यादव, उग्रसेन पांडे यांचेसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये