ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपबाजार नंदोरी येथे शासकीय आधारभूत दराने सी.सी.आय. कापुस खरेदीला सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील मे. गुरुगणेश इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड नंदोरी येथे दि. 10 नोव्हे. 2025 रोज सोमवारला शासकीय आधारभूत दराने कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. मुहूर्ताच्या एफएक्यु दर्जाच्या कापसाला ७७६० रुपये दर यावेळी देण्यात आला. आधारभूत दराने खरेदीच्या प्रारंभाप्रसंगी बाजार समितीचे सभापती राजेंद्र डोंगे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते काटा पूजन करून कापूस विक्रीसाठी आणणारे शेतकऱी विठ्ठल सिताराम दातारकर, टाकळी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

पहिल्या दिवशी ३० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. यावेळी बाजार समितीच्या उपसभापती सौ. अश्लेषा भोयर (जीवतोडे) संचालक अनिल चौधरी तसेच बाजार समितीचे सचिव नागेश पुनवटकर यांच्यासह सीसीआय भद्रावतीचे केंद्रप्रमुख नीलकंठ अकोटकर, ललिता कुमारी, मे. गुरुगणेश इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड नंदोरीचे संचालक प्रशांत कोठारी, सुशांत कोठारी, यांची उपस्थिती होती. आयोजनासाठी बाजार समितीचे कर्मचारी विलास पालकर मापारी अरुण पाठक यांनी सहकार्य केले. भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांनी सीसीआयला दि. ३१ डीसे. २०२५ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी. ऑनलाइन नोंदणीसाठी मोबाईल प्ले स्टोर्स वरून किसान ॲप डाऊनलोड करावे.

किसान ॲप डाऊनलोड केल्यानंतर कापूस विक्रीसाठी आपल्या नावाचे रजिस्ट्रेशन करावे, रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला अप्रोल देण्यात येईल व त्यानंतर आपल्याला किसान ॲपवर मेसेज येईल. किसान ॲप्स ओपन करून स्लॉट बुकिंग करणे आवश्यक आहे. असे आवाहन बाजार समितीचे सभापती राजेंद्र डोंगे, उपसभापती  अश्लेषा भोयर (जीवतोडे) व सचिव नागेश पुनवटकर यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये