ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे अपघात विमा क्लेम रक्कमेचे वाटप

चांदा ब्लास्ट
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पगार होणारे जिल्हयातील १०६४३ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा “सीडीसीसी बँक सॅलरी पॅकेज” अंतर्गत प्रत्येकी रु.३०.०० लाख चा अपघात विमा बँकेतर्फे काढण्यात आलेला आहे. शहर शाखेअंतर्गत पगार घेणारे छोटुभाई पटेल हायस्कुल, चंद्रपुर येथील शिक्षक राजेंद्र जगदिश शर्मा यांचा दि.९/४/२०२५ रोजी दुर्दैवाने अपघाती मृत्यु झाला.
बँकेचे सीडीसीसी बँक सॅलरी पॅकेज अंतर्गत बॅकेच्या प्रमुख कार्यालयात बँकेचे अध्यक्ष रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांचेहस्ते राजेंद्र जगदिश वर्मा यांची वारस पत्नी श्रीमती रजनी राजेंद्र वर्मा यांना रु.३०.०० लाख विमा क्लेम रक्कम अदा करण्यात आली. याप्रसंगी बँकेच्या संचालिका नंदाताई वसंतराव अल्लुरवार व अधिकारी उपस्थित होते.



