हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर महानगरात दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपा, भाजयुमो, महिला आघाडी व विविध आघाड्यांच्या वतीने शहरातील अनेक प्रभागामध्ये वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रामुख्याने सफाई कामगारांचा सत्कार सेफ्टी किट भेटवस्तु वितरण, महाकाली मंदिर परिसरात रक्तदान शिबीर, बचतगट महिलांना, निराधार आधार केंद्रातील महिलांना उपयोगी साहित्य वाटप, डेबु सावलीतील वृध्द बांधवांना साहित्य वितरण, सामान्य रूग्णालयातील रूग्णांना दुध व फळ वितरण, लालपेठ येथे नेत्रचिकित्सा व चष्मे वितरण कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक्स वितरण तसेच लाडक्या बहिनींकरिता पंचशिल वार्डात ई-केवायसी आदी कार्यक्रम दिवसभर आयोजित केले आहे.
शहरातील अनेक मंदिरांमध्ये वाढदिवसाचे औचित्य साधून, हंसराज अहीर यांच्या दीर्घायुष्यासाठी पुजा-अर्चना, हवन व प्रार्थना कार्यक्रमाचे सुध्दा आयोजन केले आहे.



