ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गावठी मोहा हातभट्टी काढणारे इसमावर कार्यवाही
सर्व भट्टी साहित्य असा एकूण 17 लाख 36 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन देवळी येथील अधिकारी व अंमलदार यांनी वॉश आऊट मोहीम राबवून मौजा आजगाव, दिघी, अंदोरी, कोल्हापूर राव, शिवारात गावठी मोहा हातभट्टी काढणारे इसमावर कार्यवाही करून गावठी मोहा कच्चा रसायन सडवा, सर्व भट्टी साहित्य असा एकूण 17,36,250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीतांन विरुद्ध पाच गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ठाणेदार श्री. अमोल मंडाळकर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जाधव, निमजे, पोलीस अंमलदार राजू कुरसंगे, मनोज कांबळे, विनोद कांबळे, नितीन तोडासे, गजानन महाकाळकर, अमोल अलवडकर, स्वप्निल वाटकर, मनोज नप्ते, शाम गावनेर, सागर पवार यांनी केली आहे.



