ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विशेष मोहीम अंतर्गत अवैध गावठी मोहा दारूच्या अद्ययावर पोलीसांची धडक कारवाई

लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त ; पो.स्टे. सावंगी मेघे, पोलीसांची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक १०.११.२०२५ रोजी पोलीस स्टेशन सावंगी मेघे, जि. वर्धा पोलीसांनी अवैद्य दारू विकी आणि निर्मीती करणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध धडक मोहीम राबवीली. या विशेष मोहीमेअंतर्गत, गुप्त माहितीच्या आधारे पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या पारधी बेडा, पांढरकवडा आणि शिखवेडा, सावंगी मेघे येथे पोलीसांची पथके तयार करून अनेक गावठी मोहा दारूच्या भट्टयांवर छापे टाकण्यात आले.

या कारवाईत पोलीसांनी लाखो रूपयाचा मुरोमाल जप्त केला असुन यामध्ये तयार केलेली गावठी मोहा दारू, हजारो लिटर कच्या मोहा सडवा आणि दारू गाळण्यासाठी वापरले जाणारे रसायन, भांडी आणि ईतर साहीत्य असा एकूण १५,०३,५०० रू. मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सी.ए. परिक्षणाकरिता सॅम्पल वेगळे काढुन उर्वरित मुद्देमाल नष्ट करण्यात आलेला आहे. सदर कारवाई मध्ये एकूण ०६ आरोपीविरुद्ध ०६ गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास सुरू आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींची नावे ०१. संदिपसिंग दुधानी, रा. शिखवेडा, सावंगी मेघे, ता.जि. वर्धा ०२. भोलासिंग लालसिंग भादा, रा. शिखवेडा, सावंगी मेघे, ता. जि. वर्धा ०३. सिमाकौर गुरविरसिंग खिच्ची, रा. शिखवेडा, ता.जि. वर्धा ०४. परिता मारवाडे, रा. पांढरकवडा, ता.जि. वर्धा ०५. धनपाल मारवाडे, रा. पांढरकवडा, ता.जि. वर्धा ०६. राजबिरसिंग रूपसिंग खिच्यौ, रा. शिखवेडा, ता. जि. वर्धा अशी असुन या कारवाईमुळे आरोपीमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

या कारवाईमुळे अवैध दारू निर्मीती करणाऱ्या आणि समाजात गुन्हेगारी प्रवुत्ती वाढवणाच्यावर मोठा वचक बसला आहे. या संदर्भात आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगीरी मा. श्री. अनुराग जैन सा., पोलीस अधीक्षक जि. वर्धा. मा. श्री. सदाशिव वाघमारे सा., अप्पर पोलीस अधिक्षक, जि. वर्धा, मा. श्री. प्रमोद मकेश्वर सा., उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग वर्धा यांचे मार्गदर्शनात सपोनी, पंकज वाघोडे ठाणेदार पो.स्टे. सावंगी जि. वर्धा, पो.उपनि गोपाल शिंदे, पोउपनि, डोनेकर, पो.उपनि, दुधाने, सफौ. विलास भेडे, ब.नं २०६, पो.हवा. खाडे ब.नं. ७५४, स.फौ. मुन ब.नं. ११०३, पोहवा. भगत ११३४, पोहवा पंचभाई, ६५६, पो.शि. निखील ब.नं. १५३२, पोहवा. वैद्य, ब.नं. १३९९, पी.शि. अमोल ब.नं. ६६८, पोहवा. अनुप ब.नं. १४४५, पो.शि. अंकुश ब.नं. ४५४, पो.शि. वैभव, व.नं. १५५५ पो.शि. शाम ब.नं. १६५४ व महिला अमलदार, नापोशी, शुभागी, ब.नं. १५१६, पो. हवा. पपाले, ब.नं. १५१५ यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये