ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकातर्फे गणेशपुर पारधी बेडा येथे धडक वॉशआऊट मोहिम”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  माननीय अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांचे आदेशान्वये, दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने अवैधदारू निर्मीती व विक्री करणा-या गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याची मोहिम राबविली असता, सदर मोहिमेदरम्यान पोलीस स्टेशन. समुद्रपुर हद्दीतील मौजा गणेशपुर पारधी बेडा येथे धडक वॉशआऊट मोहिम राबविण्यात आली, सदर मोहिमेदरम्यान 31,450 ली. मोहा सडवा रसायण व 360 ली. गावठी मोहा दारू, इतर भट्टी साहित्यसह जु.कि. 34,66,700 रू चा मुद्देमाल जप्त करून, जागीच नाश करण्यात आला असुन, मोहा दारूची निर्मीती करणारे आरोपी नामे 1) अपिन पवार, 2) प्राण बबन पवार, 3) मंगला प्रदिप भोसले, 4) शशीकला माणिक पवार, 5) रूस्मिल्ला इंद्रदास पवार, 6) गणराज हंसिदास पवार, 7) सुनिता दिनेश पवार, 8) सुमावती चंद्रशेखर राऊत, 9) शेषपाल माणिक पवार सर्व रा. गणेशपुर पारधी बेडा, तह. समुद्रपूर यांचेविरूध्द पोलीस स्टेशन समुद्रपुर येथे दारूबंदी कायद्यान्वये एकुण 09 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

 सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. सलाम कुरेशी, प्रकाश लसुंते, पो.अं. मनोज धात्रक, शेखर डोंगरे, अरविंद येनुरकर, हमिद शेख, रोशन निंबोळकर, महादेव सानप, रवि पुरोहित, विनोद कापसे, अभिषेक नाईक, शुभम राऊत, मंगेश आदे, सुगम चौधरी, विकास मुंडे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये