पोलीस स्टेशन सेवाग्राम येथील अधिकारी व पोलीस अंमलदार बरबडी, मांडवगड शेत शिवारात राबवीली वॉश आउट मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन सेवाग्राम येथील ठाणेदार मा.श्री. सदाशिव ढाकणे व अधिनस्त पोलीस अंमलदार यांनी पो.स्टे. सेवाग्राम अंतर्गत सध्या सुरु असलेली आदर्श आचार संहीता व आगामी होणा-य़ा स्थानिक स्वराज्य संस्थेच्य़ा निवडणुका ह्या शांततेत पार पडाव्या या अनुषंगाने मौजा मांडवगड व बरबडी शेत शिवारात वाँश आउट मोहीम राबवीली असता,
मोहीमे दरम्याण मौजा मांडवगड व बरबडी शेत शिवारा लगत असलेल्या झुडपी शिवारात झाडाझुडपात लपवुन असलेले व जमीनीत गाडून असलेले लोखंडी तसेच प्लास्टीक ड्रम ज्यामध्ये गावठी मोहा दारू गाळण्याकरीता तयार केलेला कच्चा मोहा सडवा रसायण, तसेच उकळलेला सडवा तसेच भट्टीचे ड्रम व इतर भट्टी साहीत्य असा एकुण जु.कीं. 9,87,200/-रू चा माल मिळुन आल्याने संपुर्ण मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुन जागीच नाश करण्यात आला. आरोपी 1)प्रेम भोसले रा. पुजई, 2)सुधाकर चिंतामण लेंडे रा. बरबडी, 3)कवडू बापुनाथ वरकडे रा. सेवाग्राम, 4)राहुल धर्मपाल दापे रा. सेवाग्राम यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आले.
सदरची कार्यवाही श्री. प्रमोद मकेश्वर उप.विभागीय पोलीस अधिकारी उपविभाग, वर्धा यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सेवाग्राम चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. सदाशिव ढाकणे ठाणेदार सेवाग्राम, पो.उपनि. निलेश वाडीवा, वाल्मीक बांबर्डे, पो.हवा. हरीदास काकड, जयेश डांगे, विशाल ढेकले पो.ना. स्वप्निल मोरे, धिरज मिसाळ, पो.शि. चंद्रकांत कोहचाडे यांनी केली



