महर्षी कर्वे पुण्यतिथी: एसएनडीटी महिला विद्यापीठात श्रद्धांजली

चांदा ब्लास्ट
बल्लारपूर :_ एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे संस्थापक, समाजसेवक व महिला शिक्षणाचे प्रवर्तक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची ९ नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी असून या निमित्त महिला विद्यापीठाचे बल्लारपूर आवार महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण व ज्ञानसंकुल बल्लारपूर येथे त्यांचे अभिवादन करण्यात आले.
महिला विद्यापीठ महर्षी कर्वे यांच्या प्रेरणेने महिला मुलींच्या शिक्षणासाठी १९१६ सालापासू कार्यरत आहे . सदर कार्यक्रमांत महर्षींच्या कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच त्यांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.मार्गदर्शन करताना आवाराचे संचालक डॉ राजेश इंगोले यांनी विद्यार्थिनींना महर्षी कर्वे यांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन समाजातील महिलांच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांनी मौन पाळून महर्षी कर्वे यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमास संचालक डॉ राजेश इंगोले सह सहायक कुलसचिव डॉ.बाळू राठोड, समन्वयक डॉ वेदानंद अलमस्त,सह प्राध्यापक लाभे सर, नेहा जीवतोड व सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



