ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
एस.एन.डी.टी. विद्यापीठात सामूहिक राष्ट्रगीत गायन
वंदे मातरम् गीताची १५०वी वर्षपूर्ती

चांदा ब्लास्ट
बंकिमचंद्र चट्टोपाध्याययांनी ‘आनंदमठ’ या कादंबरीतून लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताला यावर्षी ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण होत झाले त्या निमित्ताने एस एन डी टी महिला विद्यापीठ बल्लारपूर आवारात रासेयो विभागांतर्गत समूहात राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम राबविण्यात आला.उपक्रमाअंतर्गत सामूहिकपणे राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा ठरलेल्या या गीताचा उत्सव साजरा करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार सदर उपक्रम राज्यभरात राबविण्यात आला. याप्रसंगी बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ राजेश इंगोले,सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड व समन्वयक डॉ वेदानंद अलमस्त, सर्व विद्यार्थिनी तसेच समस्त शिक्षक व शिक्षकेत्र शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



