चंद्रपूर महानगरात भाजपतर्फे ‘वंदे मातरम् १५०’ अभियानांतर्गत सामूहिक गायनाचा देशभक्तीपूर्ण उपक्रम

चांदा ब्लास्ट
७ नोव्हेंबर रोजी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून संपूर्ण देशभरात “वंदे मातरम् १५०” हे अभियान उत्साहात साजरे करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर महानगरतर्फे जिल्हाध्यक्ष इंजि. श्री. सुभाष कासंगोट्टूवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध ठिकाणी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताचे सामूहिक गायन मोठ्या उत्साहात पार पडले.
या उपक्रमाद्वारे देशभक्तीचा आणि राष्ट्राभिमानाचा स्वर संपूर्ण शहरभर झंकारला. विविध शाळा, महाविद्यालये आणि परिसरातील नागरिकांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेत देशप्रेमाचा संदेश दिला. “वंदे मातरम्” चा जयघोष होताच परिसर देशभक्तीच्या भावनेने दुमदुमून गेला.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष इंजि. श्री. सुभाष कासंगोट्टूवार यांनी सांगितले की, “वंदे मातरम् हे गीत केवळ शब्दांचा संगम नसून आपल्या मातृभूमीप्रती असलेल्या अखंड श्रद्धा आणि अभिमानाचे प्रतीक आहे. या गीताच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्तीची ज्योत अधिक तेजोमय व्हावी, हा या अभियानाचा खरा उद्देश आहे.”
चंद्रपूर शहरात झालेल्या या उपक्रमामुळे सर्वत्र देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये एकतेचा आणि अभिमानाचा भाव दृढ झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
राजीव गांधी कॉलेज, ज्ञानोदया अकॅडमी द्वारका नगरी, पोलीस ग्राउंड तसेच बंगाली कॅम्प या ठिकाणी सामूहिक गायनाचे कार्यक्रम पार पडले. राजीव गांधी कॉलेज येथे कॉलेजचे अध्यक्ष श्री. मतीन शेख, भाजप महामंत्री श्री. रवींद्रजी गुरनुले, महामंत्री सौ. सविताताई दांडरे, सौ. मुग्धा गायकवाड, मंडल अध्यक्षा ॲड. सौ. सारिका संदुरकर, मंडल अध्यक्ष श्री. स्वप्नील डुकरे, श्री. दिनकर सोमलकर, सौ. सुप्रिया सरकार, सौ. सुवर्णा लोखंडे, सौ. वर्षा चिडे, श्री. राम हरने, श्री. प्रलय सरकार, सौ. लता ब्राम्हणे , सौ. सुजाता कापसे यांची उपस्थिती होती.
ज्ञानोदया अकॅडमी येथे प्राचार्या सौ. प्रज्ञाताई गंधेवार, श्री. पुरुषोत्तम राऊत, श्री. वसंतराव धंधरे, श्री. स्वप्नील डुकरे आणि श्री. सुमित बेले आदींची उपस्थिती होती.
या सर्व ठिकाणी शेकडो नागरिक, विद्यार्थी, कार्यकर्ते व पदाधिकारी उत्साहाने सहभागी झाले आणि राष्ट्रगीताच्या माध्यमातून देशप्रेमाचा संदेश सर्वदूर पोहोचवला.



