व्याहाड खुर्द येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
पोलिस स्टेशन सावली अंतर्गत येणार्या व्याहाड खुर्द येथील रहिवासी शिवम संजय डोंगरे वय २२ वर्ष या युवकाने आज (दी. ६) पहाटे ४ वा. च्या सुमारास स्वताचे घरात ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार घटनेच्या रात्री आजी जाईबाई कन्नाके मृतक शिवम व लहान भाऊ सिद्धांत हे रात्री नऊ वाजे पर्यंत घरात एकत्रित होते. त्यानंतर मृतकाची आजी जाईबाई हि चिचबोडी येथे दंडारीचा कार्यक्रम असल्याने पाहण्यासाठी गेली होती. घरात दोघेही भावंड होते.
आजी दंडार पाहूण अंदाजे पहाटे ४ च्या सुमारास घरी आली. तेव्हा घरातील सर्व लाईट सुरू होते. सदर लाईट बघून आजीला शंका आली. तिने मृतकाच्या खोलीत जाऊन पहिले असता तर मृतकांनी ओढणीने गळफास घेऊन सिलिंग फॅनला बांधून आत्महत्या केल्याचे लक्षात आले. मृतकाची अवस्था पाहून आजीने लहान नातवास उठवून रडगाणे सुरू केले. त्यामुळे घराशेजारील नागरिकांनी घराकडे धाव घेत घडलेली घटना पाहिली आणि पोलिसांना कळविले. त्यानुसार सावली पोलिस स्टेशन चे ठाणेदार घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय मुल येथे पाठविण्यात आले.
मृतकाच्या आजीने सांगितल्या प्रमाणे मृतक हा (किन्नर) तृतीय पंथी सहवासातील होता व तो इतरत्र नृत्य गाणे करण्यासाठी जात होता. या माध्यमातून तो पैसे कमावित होता. एवढेच नाही तर मृतक स्वताचे घरी बुवाबाजीचे काम करीत होता. त्यामुळे व्याधीने ग्रस्त असलेले नागरिकात मृतकाविषयी आपुलकी निर्माण झाली होती. त्यामुळे मृतकाच्या घरी नेहमीच श्रद्धापोटी नागरिकांची गर्दी असायची. घटनेच्या दोन दिवसा अगोदर मृतक हा बल्लारपूर तालुक्यातील मनोरा या गावात नृत्य व गाणे करण्याकरीता गेला होता. मृतकाचे नृत्य व गाणे पाहूण त्याचेवर फिदा झालेला अमित नावाचा युवक व त्याचे मित्र मृतकाच्या मोबाईलवर संपर्क करून खूपच त्रास देत असल्याची माहिती आजीने यावेळी दिली.
एवढेच नाही तर मृतकाने आपल्या छातीवर अमितजी असे नाव कोरले असल्याचे सांगितले. त्यामुळे आजीने अमित या युवकावर संशय व्यक्त केला असून त्या युवकांचा योग्य तपास करून त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायद्यान्वये कार्यवाही करण्याची मागणी केलेली आहे. या घटनेचा पुढील तपास सावली पोलिस करीत आहे



