ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या 616.46 कोटी रु किंमतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण जानेवारी महिन्यात होणार

भारताचे गृहमंत्री अमितजी शहा यांना आ. मुनगंटीवार यांनी दिले निमंत्रण

चांदा ब्लास्ट

नववर्षाच्या प्रारंभी आ. मुनगंटीवार नागरिकांना देणार वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवेची अनुपम भेट

मंत्रीपदाच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला वेगळा आयाम देत शिक्षण, रोजगार, कृषी, आरोग्य आणि पायभूत सुविधा या क्षेत्रात दमदार कामगिरी करत विकासाची पंचसूत्री जनतेसमोर ठेवणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतुन पूर्णत्वास आलेल्या चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण जानेवारी 2026 मध्ये होणार असून वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवेचे हे प्रशस्त दालन आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नववर्षात खुले होणार आहे. या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती आ. मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमीतजी शहा यांना केली आहे. या विनंतीला केंद्रीय गृह मंत्री अमितजी शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच ते तारीख कळवणार आहे.

चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच संलग्न 500 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाचे भव्य बांधकाम कार्य पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्न केले असून सुमारे रु. 616.46 कोटी इतकी निधी मंजूर करण्यात आला असून एच.एस.सी.सी. (इंडिया) लिमिटेड या संस्थेमार्फत मेसर्स शापूरजी पालनजी कंपनी लिमिटेड यांनी उच्च दर्जामध्ये हे कार्य पूर्ण केले आहे. अर्थमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर आ. मुनगंटीवार यांनी या प्रकल्पाला गती दिली. निधी वितरणासह शासन स्तरावर तसेच स्थानिक स्तरावर बैठकी घेवून, नियमित आढावा घेवून त्यांनी याकडे विशेष लक्ष दिले. बांधकामाचा दर्जा उच्चतम असावा यासाठी ते कायम आग्रही राहिले.

या योजनेसाठी माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे सन 2018-19 मध्ये रु. 61.47 कोटी, सन 2019-20 मध्ये रु. 115.00 कोटी, सन 2020-21 मध्ये रु. 75.00 कोटी, सन 2021-22 मध्ये रु. 135.00 कोटी, सन 2022-23 मध्ये रु. 76.00 कोटी, सन 2023-24 मध्ये रु. 124.00 कोटी आणि सन 2024-25 मध्ये रु. 30.00 कोटी असा एकूण रु. 616.46 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे.हा परिसर 100 एम.बी.बी.एस. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच विदर्भ प्रदेशातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि उपचार यांच्या दृष्टीने हे संस्थान महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात एक नवे पर्व ठरेल असा विश्वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य सेवेवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणाऱ्या आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून चंद्रपूरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालया पाठोपाठ कॅन्सर रुग्णालया सारखा महत्वाचा आरोग्य प्रकल्प साकारत आहे. त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात 14 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामांना मंजूरी देण्यात आली असून बल्लारपूर, पोंभुर्णा येथे ग्रामीण रुग्णालय, मुल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, उमरी पोतदार, कळमना येथे स्मार्ट प्रा. आ. केंद्र तसेच आरोग्य संकुले पूर्णत्वास आली आहेत. त्याच प्रमाणे वैद्यकीय शिक्षणा सोबतच शिक्षण क्षेत्रात देखील सैनिकी शिक्षण देणारी चंद्रपूर जिल्‍हयातील अत्‍याधुनिक सैनिकी शाळा, बल्‍लारपूर येथील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे उपकेंद्र, स्‍व. सुषमा स्‍वराज महिला सक्षमीकरण केंद्र बल्‍लारपूर, कृषी शिक्षण व प्रशिक्षण देण्‍यासाठी मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय, शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूरसाठी टाटा समूहातर्फे ९ ट्रेनिंग सेंटरसाठी २६७ कोटी रू. निधी, ग्रंथालय व मुलींचे वसतीगृह यासाठी १२ कोटी रू. निधी, बल्‍लारपूर येथे डिजीटल शाळा, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे उपकेंद्र स्‍थापन करण्‍यासाठी प्रयत्‍न, बल्‍लारपूर, पोंभुर्णा, मुल येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था अधिक सक्षम करण्‍यासाठी प्रयत्‍न आ. मुनगंटीवार यांनी केले आहे. मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्‍यासाठी राज्‍य शासनाने नुकतीच मान्‍यता दिली आहे. त्यांचा शैक्षणिक विकासाचा दृष्टीकोन जिल्ह्याच्या विकासाला वेगळी उंची बहाल करणारा ठरला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये