ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

छत्रपती शाहू महाराजांचे शिक्षण विषयक कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. शिक्षण हे सर्व समस्यांचे मूळ आहे हे जाणणारे प्रथम राजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय.छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला होता. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते. कोल्हापूर संस्थानाचे ते राजे होते. छत्रपती शाहू महाराजांना शिक्षणाची प्रचंड आवड होती सर्वच बहुजनांच्या शिक्षणासाठी छत्रपती शाहू महाराजांनी प्रचंड मोठे शैक्षणिक कार्य करून ठेवले आहे। व त्यांनी वंचित शोषित बहुजन समाजाला शिकता यावे यासाठी बहुजनांसाठी मोठी शैक्षणिक चळवळ उभी करणारे ते एकमेव छत्रपती होते.शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन आहे. शिक्षणामुळे माणसाचे,समूहाचे जीवन बदलते,शिक्षणाने माणूस बुद्धिवान,शीलवान होतो. असे विचार महाराजांचे होते. छत्रपती शाहू महाराजांनी विविध जाती धर्माच्या मुलांसाठी अनेक वस्तीगृह सुरू केले होते. प्रत्येक जाती धर्मातील मुलांना शिक्षण मिळावा हा या मागचा प्रमुख उद्देश होता.वंचित,कष्टकरी, शोषित, दीनदुबळ्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक शाळा व वस्तीगृह उभारून शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली.छत्रपती शाहू महाराजांनी ४ मार्च १९१८ ला ऐतिहासिक घोषणा केली ती म्हणजे मोफत व सक्तीचे शिक्षण.अशी घोषणा करणारे ते शिक्षणाचे एकमेवाद्वितीय महामेरु ठरले मोफत व सक्तीचे शिक्षण करूनही काही पालक आपली मुले शाळेत पाठवत नव्हती म्हणून अशा पालकांना महाराजांनी त्या काळात प्रति महिना एक रुपया दंड ठोठावला व त्याची कडक अंमलबजावणी केली.आरक्षणाची प्रथमतः सुरुवात त्यांनी आपल्या संस्थांनापासून केली आणि ते आरक्षणाचे जनक ठरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी मदत करून दलितांच्या न्याय, हक्कासाठी लढणारे नेतृत्व समाजाला दिले छत्रपतींच्या या शैक्षणिक कार्यामुळे आज अनेक समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळत आहे.छत्रपती शाहू महाराजांच्या या शिक्षण विषयी कार्याला शत शत नमन…

शब्दांकन
श्री दिपक अर्जुन गोतावळे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये