ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विभागीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत २५६ खेळाडूंचा सहभाग

चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकूल येथील वातानुकूलीत हॉलमध्ये आयोजन

चांदा ब्लास्ट

नागपूर विभागीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धांचे आयोजन ३० व ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वातानुकूलित बॅडमिंटन हॉल येथे करण्यात आले. यात नागपूर विभागातील नागपूर ग्रामीण, नागपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर ग्रामीण, चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यातून १२८ मुले व १२८ मुली असे एकूण २५६ खेळाडू मुला-मुलींनी सहभाग नोंदविला.

युवक सेवा संचालनालय, पूणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी, चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वातानुकूलीत बॅडमिंटन हॉलमध्ये राज्य, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण होत असून त्याचा लाभ जिल्ह्यातील खेळाडू मोठ्या प्रमाणावर घेत आहे, असे सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी तथा स्पर्धा प्रमुख मनोज पंधराम यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी व जिल्हा क्रीडा संकुल समिती चंद्रपूरच्या कर्मचा-यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी मोठया प्रमाणात खेळाडू व नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये