आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून उर्जानगरमध्ये विकासाचा नवा टप्पा !
विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने उजळेल विकासाचा नवा प्रवास

चांदा ब्लास्ट
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते २ नोव्हेंबर रोजी होणार भूमिपूजन
चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते ०२ नोव्हेंबर रोजी दुपारी २.०० वाजता, उर्जानगर (ता.जिल्हा चंद्रपूर ) येथे अय्यपा मंदिर ते गोपाल डेअरी पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामासाठी एकूण किंमत ₹२ कोटी ५० लक्ष रुपये मंजूर झाले असून या महत्त्वपूर्ण कामाचे भूमिपूजन होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने ऊर्जानगर विकासाचा नवा टप्पा गाठणार आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे हा निधी मंजूर झालेला आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी सन २०२४-२५ अंतर्गत मंजूर झालेल्या या निधीमुळे उर्जानगर परिसरातील नागरिकांना उत्तम पायाभूत सुविधा आणि सुलभ वाहतुकीचा लाभ मिळणार आहे.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री असताना नेहमीच चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या पुढाकाराने सैनिकी स्कूल, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल,बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनअकादमी,रामसेतू , इंजीनियरिंग कॉलेज आणि अनेक पायाभूत प्रकल्पांमुळे चंद्रपूर शहराचा चेहरा-मोहरा बदलला आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सततच्या प्रयत्नांतून उर्जानगर परिसराला आधुनिकतेची नवी दिशा लाभत आहे. उर्जानगर परिसरातील हे भूमिपूजन त्या अखंड विकासप्रवासातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. नागरिकांच्या सोयी-सुविधांचा स्तर उंचावणे, वाहतुकीची अडचण दूर करणे आणि परिसराचे सौंदर्य अधिक खुलविणे या दृष्टीने हे काम अत्यंत मोलाचे ठरेल. उर्जानगर परिसराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या उपक्रमामुळे नवा अध्याय आरंभ होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला असून, या विकासकामासाठी त्यांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.



