ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निलज येथे जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या हस्ते लोकार्पण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपूरी तालुक्यातील निलज येथील जिल्हा परिषद शाळेतील नवीन वर्गखोलीच्या इमारतीचे लोकार्पण जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

निलज येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 150हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र संख्येच्या प्रमाणात सुव्यवस्थित स्थितीत वर्गखोल्या उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. यासंदर्भात निलज येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी व शाळा व्यवस्थापन समीतीच्या पदाधिकाऱ्यांनी सदरची समस्या तत्कालीन जिल्हा परिषदेचे सदस्य प्रमोद चिमुरकर यांना सांगितली. तेव्हा चिमुरकर यांनी प्रयत्न करून दोन वर्गखोल्या मंजूर करून दिल्या. सदर दोन्ही वर्गखोल्यांचे बांधकाम पुर्ण झाले असुन लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला आहे. गावातील नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये