ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिवाळी पहाटने श्रोते दोन तास मंत्रमुग्ध

स्वामी विवेकानंद संस्कार वर्गाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

 ब्रम्हपुरी :- सोमवारी सकाळी शेष मंदिर ब्रह्मपुरी येथे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रम एकाहून एक बहारदार गीतांच्या सादरीकरणाने रंगला. सकाळी ६ वाजता सुरुवात झालेल्या कार्यक्रमात श्रोते दोन तास मंत्रमुग्ध झाले. १९९४ पासून स्वामी विवेकानंद संस्कार वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने सौ सविताताई जयंत खरवडे यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी शेष मंदिर ब्रह्मपुरी या ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला जातो .

     सकाळी सहा वाजता सुरांची सोनसकाळ बहारदार गीतांच्या बंदिशिने झाली. यात गणेश वंदना,मराठी गीते,भजने,गझल, भावगीते यांचे गायन आणि वादन चिमुकल्यांकडून झाले. कोणत्याही संगीत शाळेत न जाता एकाहून एक सुरेल गीतांची मैफिल सादर करून बालगोपालांनी प्रचंड टाळ्या मिळवल्या.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्राचार्य श्री. सुयोग बाळबुधे, प्रमुख अतिथी म्हणून श्री. नंदुजी गुडेवार, श्री. ज्ञानेश्वर गेटकर, श्री. तनय देशकर उपस्थित होते. राजकीय मंडळींसोबत परिसरातील रहिवाशांनी सुद्धा या दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आनंद घेतला. तब्बल दोन तास ही सुरांची मैफल रंगली होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये