“दिवाळी आपल्या लोकांसोबत” — श्री गुरुदेव प्रचार समितीचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री गुरुदेव प्रचार समिती बहुउद्देशीय संस्था, गडचांदूर यांच्या वतीने “दिवाळी आपल्या लोकांसोबत” हा सामाजिक उपक्रम यंदा सलग तिसऱ्या वर्षी अत्यंत उत्साहात पार पडला.
हा उपक्रम दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता रायपूर, खडकी आणि मारोतीगुडा (ता. जिवती, जि. चंद्रपूर) येथे संपन्न झाला.
ग्रामगीताचार्य प्रचारमूर्ती विठ्ठलदास डाखरे महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा उपक्रम समाजातील गरजू, वंचित आणि ग्रामीण भागातील लोकांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविण्याचे सुंदर उदाहरण ठरत आहे.
या उपक्रमात अनेक समाजसेवी दानदाते सहभागी झाले होते. त्यामध्ये रामानंद जी आगे (नांदा), संतोष जी टोंगे (वडगाव), श्री जगन्नाथ जी चटप (WCL कॉलनी म्हातारदेवी), राजू जी रामचंद्र भोगळे (घुघुस), प्रा. संजय ठावरी (कोरपना), डाखरे महाराज फाउंडेशन ( अमरावती ), डॉ. चांदेकर सर (नांदा फाटा), शिवम मेडिकल (गडचांदूर), डॉ. किंगरे (गडचांदूर), यश काथवटे( शेगांव) यांचा समावेश होता.
उपस्थित मान्यवरमध्ये प्रचारमूर्ती ग्रामगीताचार्य विठ्ठलदास डाखरे महाराज, बापूजी पिंपळकर, डॉ. किंगरे डॉ. किंगरे मॅडम, आकाश मडावी, हनुमान सुरपाम, अभिषेक भोयर, यश काथवटे, जैतू पा. कोडापे, बालाजी मडावी, संतोष पा. टोंगे, डाखरे महाराज फाउंडेशनचे डायरेक्टर धनंजय विठ्ठलराव डाखरे, मॅनेजिंग डायरेक्टर सौ. संप्रदा धनंजय डाखरे, सौ. मायाताई डाखरे, प्राची डाखरे, मिलिंद वाघमारे, आदित्य बोबडे आदी मान्यवर व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
मारोतीगुडा येथेही फराळ वाटप करण्यात आले. त्यावेळी स्थानिक आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य सादर करून वातावरण रंगवले.
तसेच नांदा फाटा येथील शिक्षकवृंदांनी बाल संस्कार शिबिरात सहभाग घेत सेवाभावाने योगदान दिले.
गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने आणि यशस्वीपणे राबवला जात आहे —
पहिल्या वर्षी घोडनकप्पी, दुसऱ्या वर्षी मारोतीगुडा, आणि यंदा रायपूर, खडकी आणि मारोतीगुडा येथे दिवाळीचा हा सामाजिक दीप प्रज्वलित झाला.
“दिवाळी आपल्या लोकांसोबत” हा उपक्रम समाजात ऐक्य, आपुलकी आणि मानवी संवेदनांचा उजाळा देणारा ठरत असून, वर्षागणिक त्याचा विस्तार आणि प्रभाव वाढत आहे.