पारडी येथे जनसंपर्क कार्यालय उद्घाटन व सत्कार सोहळा थाटात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना तालुक्यातील पारडी येथे भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. प्रसंगीच या कार्यक्रमात आमचा पारडी येथील ग्रामस्थांच्या वतीने सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करीत सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देत प्रत्येकांच्या आयुष्यात सुख,शांती, समृद्धीची मनोकामना केली.
पारडी येथे नवीन भाजपा जनसंपर्क कार्यालय सुरू केल्याने परिसरातील नागरिकांना मोफत सेवा, सुविधा,उपलब्ध होणार आहे. हे कार्यालय सर्वसामान्य जनतेसाठी खुले असून, नागरिकांच्या अडचणी, समस्या आणि त्यांच्या अपेक्षाचे थेट निराकरण जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
यावेळी माझ्यासमवेत पत्नी अर्चना, भाजपा जिल्हा सचिव विनोद चौधरी, माजी जिल्हा परिषद सभापती निता चौधरी, कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, राजुरा शहर महामंत्री सचिन भोयर, पुरुषोत्तम भोंगळे, अरुण मडावी, दिनेश खडसे, कार्तिक गोंलावार, जगदीश पिंपळशेंडे, दिनेश ढेंगळे, अमोल आसेकर, प्रमोद कोडापे, मनोज तुमराम, चंदुलाल इंगळे, यशवंत इंगळे, भास्कर राऊत, पंढरीनाथ इंगोले, रमेश राठोड, गोवर्धन वाघाडे, सुरेश कोंडावार, महादेव दूतकोर, मधुकर झुलकंटीवार,नागोराव शहारे यांचेसह भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.