ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरफोडीचा गुन्हा उघडकीस., सोने व चांदीच्या दागिन्यांसह एकूण 2 लाख 5 हजारावर मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा, वर्धाच्या पथकाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 16/10/2025 रोजी फिर्यादी सौ. पार्वताबाई बंडूची श्रीरामे, वय 50वर्ष, रा. उसेगाव कॉलनी कोरा, तह. समुद्रपूर जिल्हा वर्धा ह्या घराचे दरवाज्याची कडी लावून शेतमजुरीचे काम करता गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराची कडी काढून घरात प्रवेश करून घरातील दुसऱ्या बेडरूम मध्ये असलेल्या लोखंडी पेटी उघडून पेटीमधील वेगवेगळ्या प्लस्टिक डब्यामध्ये ठेवून असलेले सोन्याचे व चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्यावरून फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन गिरड येथे अपराध क्रमांक 287/2025 कलम 305(a),331(3) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद असून तपासावर आहे.

         दिनांक 19/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन गिरड येथील नमूद गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हा उघडकीस आणण्याच्या उद्देशाने सर्वतोपरी तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यातील महिला आरोपीस विश्वासात घेऊन चोरी गेलेल्या सोन्याच्या दागिण्याबाबत विचारपूस केली असता तिने घरी कोणी नसताना घरातीतील लोखंडी पेटी मध्ये ठेवून असलेले सोन्याचे व चांदीचे दागिन्या ची चोरी केल्याचे कबुल केल्याने महिला आरोपीच्या ताब्यातून 1) एक नग सोन्याचा गोफ वजन १२ ग्राम किंमत 1,35,660 रू, 2) सोने झाले टॉप्स एक जोड वजन 04 ग्रॅम कि. 33,320 रू, 3) एक जोड सोन्याची डोरले वजन 01.730 ग्रॅम किंमत 14,400 रुपये 4) सोन्याचे पिटिव मनी (47) नग वजन 01.960 ग्रॅम किंमत 16,303 रुपये 5) एक सोन्याची नथ वजन 00.710 ग्रॅम किंमत 5000 रुपये 6) एक जोड चांदीचे जोडवे वजन 09.960 ग्रॅम किंमत 1,120 रूपये असा जु.कि. 2,05,303 रू चा मुद्देमाल जप्त करून घरफोडीचा गुन्हा उघडकिस आणला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन गिरड करीत आहे.

        सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. सदाशिव वाघमारे सा., स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा यांचे निर्देशाप्रमाणे पो.उपनि. प्रकाश लसुंते, स.फौ. मनोज धात्रक, पो.हवा. महादेव सानप, पवन पन्नासे, विनोद कापसे, म. पो. हवा. पल्लवी बोबडे, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये