ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

राष्ट्रवादी आर्वी ता. सचिव ज्ञानदीप धुर्वे, विनोद भाऊ पायले व निरंजन भाऊ पाटील मित्र परिवारचा ‘वंचित’मध्ये जाहीर प्रवेश!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

– राष्ट्रवादी आर्वी ता. सचिव ज्ञानदीप धूर्वे व निरंजन भाऊ पाटील मित्र परिवार मधील आर्वी विधानसभा अलुतेदार बलुतेदार कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश झाला.

आर्वी ता. येथे वंचित बहुजन युवा आघाडी आर्वी यांची बैठक ठेवण्यात आली असतानी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व मा. विनयजी भांगे जिल्हा प्रभारी तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य वंचित बहुजन आघाडी, यांच्या मार्गर्शनाखाली वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष भाऊ गुजर, वंचित बहुजन युवा आघाडी वर्धा उपजिल्हाध्यक्ष दर्पण पंजाबराव टोकसे यांच्या कार्य कुशलतेवर विश्वास ठेवत राष्ट्रवादीचे ता. सचिव ज्ञानदीप धूर्वे, विनोद भाऊ पायले व निरंजन भाऊ पाटील मित्र परिवार आर्वी विधानसभा अलुतेदार बलुतेदार कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहिर प्रवेश झाला.

प्रमुख अतिथी मा. सुखदेव नंदागवळी काका, धम्मप्रचारक मा. मधुकर सवाळे काका धम्मप्रचारक सुरेश भिवगडे सर धम्मप्रचारक, सागर भोवते युवा आघाडी महासचिव, अमरावती प्रज्वल यावले युवा आघाडी ता. अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थितीत, निरंजन पाटील सामाजिक कार्यकर्ते, विनोद पायले सामाजिक कार्यकर्ते, ज्ञानदीप धूर्वे सामाजिक कार्यकर्ते, राजू डोंगरे, निखिल खडसे सामाजिक कार्यकर्ते, दिनेश तायवाडे,पंकज चतुर, सावरकर, प्रविण सातपुते, निलेश पाचोडे, रोशन काळपांडे,प्रतीक सुर्यवंशी, वीरेंद्र दुधे, सागर गजबे, सूरज मेहरे सामाजिक कार्यकर्ते,पंकज गडलिंग – हैबतपुर, रोशन काळपांडे, अशोक पोहेकर, प्रतीक सुर्यवंशी, तुषार सावरकर, बादल खंडारे,कुणाल काळपांडे, अनिमेश लांडगे,समीर काळे, यश पवार, अक्षय भगत,संदीप दहिवाडे,सागर मेंढे,संदीप तायडे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये