वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी
व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्र घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
सावली : व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्र अंतर्गत केरोडा येथील नामदेव किसन कुकडे हे दररोज प्रमाणे आपल्या बकऱ्या घेऊन २८० गट क्रमांक जंगल व शेत परिसरात बकऱ्या राखत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून गुराख्याला जखमी केल्याची घटना घडली आहे.
सर्व गुरख्यांनी जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी नेताना सुरक्षीता बाळगावी सामदा/पेठगाव, सोनापूर, व्याहाड बूज. आणि वाघोली गावातील गुराखी, बकऱ्या चारणारे तसेच गावकऱ्यांना सूचीत करण्यात आले असून शेतात अथवा जंगलात कोणत्याही कामानिमित्य जात असल्यास खबरदारीने जावे व आपल्या जीवाची काळजी घ्यावी असे वनविभाचे कर्मचारी यांनी नागरिकांना सूचना दिल्या होत्या.
सदर घटना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत होताच घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व नामदेव कुकडे या जखमी गुराख्याला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचार सुरू आहे. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, उपवन परिक्षेत्र अधिकारी मारोती पूल्लेवाड, डी. एस. शेडमाके वनरक्षक सामदा, डांगे, खुळे वनरक्षक कर्मचारी आदी उपस्थित होते.



