ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कन्हाळगावात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाची जय्यत तयारी

राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धा व गोपाळकाल्याचे आयोजन; मान्यवरांची राहणार उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून कन्हाळगाव येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव आयोजन समितीच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ४ सप्टेंबर व शनिवार, ५ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण मंदिर, बस स्टॉपजवळ कन्हाळगाव येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.

महोत्सवानिमित्त राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धा, भजन-कीर्तन, महापूजा, आरती, मार्गदर्शन व गोपाळकाला आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बालगोपालांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

या कार्यक्रमाला खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार देवराव भोंगळे, आमदार संजय देरकर, माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार संजय धोटे, ठाणेदार ललिताई वाडीये, तसेच प्रतिक गजाननराव बोरडे, श्रीधर गोडे, सरपंच सुरेकाताई नवले उपसरपंच वंदनाताई बलकी, विनोद भाऊ नवले, अरुण डोहे, आबिद अली, भाऊराव बोरडे, उत्तमरावजी पेचे, संजय मुसळे, दामोदर मालेकार, , सुनील बावणे, निळकंठ कोरांगे, प्रकाश खनके अमोल आसेकर, संजय ठावरी , विशाल गज्जलवार, रमाकांत मालेकर, अनिल गोंडे, नारायण हिवरकर ,अरुण मडावी, डॉक्टर अरुण ठाकरे, श्रीमती गीता ताई डोहे, शशिकलाताई कुडमेथे, यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

तसेच कार्यक्रमाच्या आयोजनात श्रीमती प्रतिभाताई बाळकृष्ण धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती असून, देवराव दादा भोंगळे व संजय धोटे यांच्यासह मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडणार आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित या भव्य सोहळ्यात परिसरातील नागरिकांनी व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालगोपालांचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन श्रीकृष्ण जन्मोत्सव आयोजन समिती तथा समस्त ग्रामस्थ कन्हाळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये