दारू पिवून दारूच्या नशेत मोठे वाहन हायड्रा चालवीणाऱ्या चालकाविरुद्ध मोटर वाहन कायद्यानये गुन्हा दाखल
वाहतूक नियंत्रण शाखेची कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सध्या दीपावली निमित्ताने बाजारात गर्दी असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता चौकचोकात मा पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन सर यांच्या आदेशानवये वाहतूक अंमलदार यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
दि. 18/10/25 रोजी दुपारी 02/00 वाजेच्या दरम्यान बजाज चौकात एक हायड्रा वाहन चालक हा बजाज चौकातील सिग्नलवर निष्काळजीपणे भरधाव वेगाने त्याचे वाहन चालवीतना वाहतूक पोलीस ASI मंगेश येळणे यांना दिसून आला त्याचे वाहणावर नियंत्रण नसल्याने ते वाहन दुसऱ्या स्विफ्ट गाडीला घासले गेले त्यावरून त्या चालकास जवळ बोलावून त्यास विचारपूस केली असता तो दारू पिवून दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले, त्यावरून त्याची मेडिकल तपास्नी केली असता तो दारूच्या नशेत आसल्याचे तपासनीत दिसून आले, त्यावरून सदर हायड्रा वाहन क्रमांक MH 27 AX 2227 चा चालक नामे संदीप मधुकर मंगरुळकर वय 35 वर्ष रा, बोरगावं मेघे जि वर्धा, याचया विरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185 (दारू पिवून वाहन चालाविणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर वाहन पोलिसांनी कायदेशीर कार्यवाही करून ताब्यात घेतलेले आहे, सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन सर यांच्या आदेशनवये सहाय्य्क पोलीस उप निरीक्षक मंगेश येळणे, पो हवा आशिष देशमुख, पो हवा मुन्ना तिवारी वाहतूक नियंत्रण शाखा यांनि आज बजाज चौकात केलेली आहे.
तरी कोणत्याही वाहन चालकाने आपले वाहन दारू पिवून चालवू नये असे आवाहांन वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी सर्व चालक यांना केलेले आहे,
पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा