महाराष्ट्राच्या शिरपेचात ब्रह्मपुरीच्या प्रणयने रोवला मानाचा तुरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
उडीसा राज्यातील भुवनेश्वर येथे पार पडलेल्या १८ वर्षाखालील १००० मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्रातील ब्रम्हपुरी येथील प्रणय गणेश उपासे १७ याने तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदक पटकाविले आहे. राष्ट्रीय आथेलेटिक स्पर्धेत स्थान मिळवून भारतातून तिसऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावून प्रणयने ब्रह्मपुरीच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला आहे.वडिलांचे छत्र हरपलेला प्रणय आई व छोट्या बहिणीसोबत येथील पेठ वॉर्डात वास्तव्यास आहे. तुटपुंजी शेती असल्याने आई मजुरी करते. प्रणयचे १ -१० वी पर्यंतचे शिक्षण हिंदू ज्ञान मंदिर येथे झाले. ११ वीला त्याने लो. टी. विद्यालयात प्रवेश घेतला.
सध्या तो १२ वीला आहे. लहानपणापासून खेळाची आवड असल्याने त्याने नियमित धावण्याचा सराव केला. नागपूर येथील मार्गदर्शक गजानन ठाकरे व ब्रम्हपुरी येथील मार्गदर्शक रोहित बुरांडे यांचे प्रणयला मार्गदर्शन लाभले. ४० व्या राष्ट्रीय आथेलेटिक स्पर्धा दि. १० – १४ या कालावधीत भुवनेश्वर येथे पार पडली. त्यात हरियाणाचा प्रिन्स प्रथम, द्वितीय क्रमांक उत्तराखंड येथील सुरज सिंग याने मिळविला.तर महाराष्ट्रातील एकमेव धावपटू प्रणय उपासे याने तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदक जिंकले आहे.मागील वर्षी देखील पटना बिहार येथे पार पडलेल्या स्पर्धेत त्याने चौथा क्रमांक प्राप्त केला होता.
ब्रम्हपुरी ही क्रीडा नगरी म्हणून ओळखली जाते. अनेक खेडाळू यापूर्वी अनेक स्पर्धांमध्ये चमकले आहेत. प्रणयच्या यशाने ब्रम्हपुरी शहराच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रणयचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.