शिवसेना उबाठा पक्षाच्या भद्रावती तालुका प्रमुख पदी नंदु पढाल तर शहर प्रमुख पदी घनश्याम आस्वले यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख मा. श्री भास्कर जाधव साहेब आणि चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख मा. श्री प्रशांत दादा कदम यांच्या मार्गदर्शनात व चंद्रपूर जिल्हा प्रमुख मा. श्री भास्कर भाऊ ताजने यांच्या सूचनेनुसार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ( नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती ) डोळ्यासमोर ठेवून श्री नंदू म. पढाल( आपला माणूस) नगरसेवक नगरपरिषद भद्रावती तथा उपाध्यक्ष विदर्भ विभागीय सहकारी संघ नागपूर यांची चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुका प्रमुख या पदावर तिसऱ्यांदा फेर नियुक्ती करण्यात आली तसेच श्री घनश्याम आस्वले यांची सुद्धा भद्रावती शहराच्या शहर प्रमुख पदी तिसऱ्यांदा फेर नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुखपृष्ठ दैनिक सामना या वृत्तपत्रातून दिनांक 16 ऑक्टोबर 2025 ला प्रकाशित करून देण्यात आल्या.
या फेर पदनियुक्त्यांमुळे भद्रावती तालुक्यातील व शहरातील सर्वच शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक व जनतेमध्ये आनंदाचे वातावरण असून संपूर्ण जिल्ह्यातून यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.