ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ओमप्रकाश पांडे व सोनाली गावंडे यांना ग्रामगीताचार्य पदवी प्रदान

ओमप्रकाश ग्रामगीताचाऱ्यांमध्ये तर सोनाली ताई पाठांतरामध्ये प्रथम : गुरुकुंज आश्रम मोझरी येथे पदवी प्रदान

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ,गुरुकुंज आश्रम मोझरी चे वतीने आयोजित वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथी महोत्सव प्रसंगी गुरूदेव सेवा मंडळ भद्रावती चे युवा कार्यकर्ते ओमप्रकाश शेषानंद पांडे व सौ.सोनालीताई अमोल गावंडे यांना ’ग्रामगीताचार्य’ पदवी प्रदान करण्यात आली.

  अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम,मोझरी चे वतीने दरवर्षी ग्रामगीता जीवन विकास परीक्षा घेतल्या जाते. या परीक्षेत ओमप्रकाश पांडे यांनी महाराष्ट्रातून सर्वाधिक गुण मिळवून पहिला नंबर तर सौ.सोनाली गावंडे यांनी पांठातर मध्ये ९९ गुण घेऊन पांठातर प्रथम क्रंमाक मिळवून भद्रावतीचे शिरुपेच्या मानाचा तुरा रोवला. या ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभामध्ये गुरुकुंज आश्रम मोझरीचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, संचालक मंडळाच्या अध्यक्ष पुष्पाताई बोंडे, परीक्षा विभागाचे अध्यक्ष गुलाबराव खवसे, सचिव गोपालदादा कडु, पौर्मिमाताई सवाई,रूपलालजी कावळे व इतर मान्यवरांच्या उपस्थिती सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ग्रामगीताचार्य पदवी प्रदान करण्यात आली. सदर परीक्षा राष्ट्रसंतश्री तुकडोजी महाराज यांच्या समग्र वाडमय व ग्रामगीतेवर आधारित असते.ओमप्रकाश पांडे यांचे वडील आदिनाथ गुरू माऊली सेवाश्रम बरबडी संस्थापक श्री ब्रम्हमुर्ती शेषानंद पांडे महाराज असुन लहानपना पासुन आद्यत्मिक अभ्यासाचे मार्गदर्शन होते. तर श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे आधारस्तंभ स्व.जगन्नाथजी गावंडे दादा यांच्या मोठी सुन सौ.सोनाली अमोलजी गावंडे आहे. दोनही परिवारांना आध्यात्मिक वारसा असल्यामुळे त्यामध्ये त्यांना सुलभरीत्या यश मिळवीता आले.

या यशस्वीतेबद्दल ग्रामगीता जिवन विकास परीक्षा भद्रावती तालुका प्रमुख विशाल गावंडे, गुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकर्तें चंद्रकांतजी गुंडावार, गुणवंत कुत्तरमारे, मेश्राम महाराज, कालिदास चेडे, बालाजी नागपुरे, नरेंद्र मेश्राम,झनक चौधरी,गजानन डंभारे,विवेक महाकाळकर,विनोद रासेकर, नरेश दिवसे,रमेश धांबेकर, रवी पचारे,मधुकरजी बांदुरकर,अशोक गौरकार, प्रकाश पिंपळकर,खुशाल कंचरलावर तसेच श्रीगुरूदेव सेवा मंडळ तथा श्रीगुरूदेव सुसंस्कार शिबीर भद्रावती व अनेक सामाजिक, धार्मिक संस्था तर्फे अभिनंदन व पुढील वाटचाली करीता शुभेच्छा देण्यात आल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये