ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुस काँग्रेसची आढावा बैठक पार

गजानन मासिरकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीसाठी तयारीला वेग

चांदा ब्लास्ट

घुग्घुस :_ पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर घुग्घुस नगरपरिषदेच्या निवडणुका लागण्याची चाहूल लागली आहे. नगराध्यक्ष पदाचे तसेच प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक तयारीस सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने घुग्घुस नगरपरिषद, पडोली जिल्हापरिषद व पंचायत समिती तसेच नकोडा, मारडा जिल्हापरिषद व पंचायत समितीचा आढावा घेण्यासाठी १७ ऑक्टोबर रोजी तुकडोजी नगर, वॉर्ड क्र. ०६ येथे बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस खासदार प्रतिभा धानोरकर, प्रभारी मुजीब पठाण, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, प्रवीण पडवेकर, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चोखारे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, तालुका अध्यक्ष अनिल नरुले, शामकांत थेरे, एन.एस.यु.आय. जिल्हाध्यक्ष शफक शेख, ज्येष्ठ नेते जयंता जोगी, लक्ष्मण सादलावार, शामराव बोबडे, मुरली चिंतलवार, हनिफ शेख, माजी उपसरपंच सुरज तोतडे, सरपंच संध्या पाटील, माजी उपसरपंच हितेश लोढे आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान शहरातील प्रसिद्ध व्यवसायिक व सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर गजानन मासिरकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. खासदार प्रतिभा धानोरकर व जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी त्यांच्या गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले.

मासिरकर हे ओबीसी समाजातील तरुण नेतृत्व असून त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला आगामी निवडणुकीत बळ मिळणार असल्याचे नेत्यांनी सांगितले. मासिरकर हे ओबीसी गटातून निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

बैठकीत आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या रणनीतीवर, संघटन मजबूत करण्यावर व स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये