संत गोमाजी महाराज संस्थान विठ्ठल धाम येथे अमृतमहोत्सव अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जे.टी कराळे साहेब यांच्या जन्मदिवसाचे निमित्ताने ७५वर्षात ज्यांच पदार्पण झाले अश्या सेवाभावी व्यक्तिचा अभिष्ठचिंतन सोहळा माजी जिल्हासत्र न्यायधिश अँड सन्मा. सहदेवरावजी हिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली सन्मा धंनजय पाटील अध्यक्ष संत गोमाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महान तपस्वी, वैराग्यधारण करणारे, सेवाभावी आमचे बाबा गोपाळबाबा उरळ कर यांच्या शुभहस्ते व मार्गदर्शनात भव्यदिव्य नियोजनात संपन्न झाला.
यावेळी सत्कार मुर्ती सन्मा.श्रीकृष्ण कराळे (टेलर) सन्मा.मुंगटराव पाटील टिकार, ह.भ.प.डॉ ज्ञानेश्वर दादा मिरगे, जे.टी कराळे, पांडुरंगजी काळींगे, रघुनाथाबा यांचा शाल श्रीफळ गोमाजी महाराज चरीत्रग्रंथ देऊन आयोजन समितीच्या वतिने खंडुजी ठाकरे,हरीभाऊजी कराळे,गजानन पा.ईश्वर कराळे रामेश्वरजी पाटील.रविदादा कराळे.यांनीसत्कार केला. सर्व सत्कारमुर्तिला आर्शिवाद गोपाळबाबा यांनी दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वरजी कराळे यांनी केले, तर सुत्र संचालन सुंदर मधुरभाषेत ईश्वरदादा कराळे यांनी केले.
सर्वप्रथम संत गोमाजी महाराज वं.राष्ट्संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून दिपप्रव्जन पुष्पमाला अर्पण करुन प्रारंभ झाला.,अतिथी मध्ये व्यासपीठावर गुरुदेव सेवा मंडळाचे भानुदास कराळे, भाऊरावजी हिंगणेगुरुजी, ह.भ.प.सोपान महाराज, प्रा.सुभाषराव पार्थीकर, पांडुरंग ठाकरे,यांचे स्वागत् उपस्थित मान्यवर कडुन झाले.