ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवळी शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन आणि मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी :_ शहराच्या सुरक्षिततेत मोलाची भर घालणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा प्रणालीचा उद्घाटन सोहळा आणि गुन्ह्यातील फिर्यादींना चोरीतील हस्तगत मालमत्ता व हरवलेले मोबाईल परत करण्याचा कार्यक्रम दि. १७/१०/२०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या दुहेरी कार्यक्रमाने देवळी शहराच्या पोलीसिंगला एक नवी दिशाव बळकटी मिळाली आहे.

जिल्हा यांच्यामुळे तसेच जिल्हा नियोजन समिती यांच्या प्रयत्नाने देवळी शहरातील सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली चा महत्वकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास येऊन या महत्त्वाकांक्षी सोहळ्याला मा. ना. डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री गृह (ग्रामिण), गृह निर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म विभाग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, वर्धा या कार्यक्रमाच्या उद्घाटनास यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेरा प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. शहराचे सुरक्षित वातावरण राखण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

गुन्ह्यांचा त्वरित तपासः सीसीटीव्ही प्रणालीचे महत्त्व

सीसीटीव्ही कॅमेरा प्रणालीमुळे शहराच्या मुख्य रस्त्यांवरील आणि संवेदनशील भागांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसेल तसेच चोरी, अपघात आणि इतर गुन्ह्यांचा तपास जलद गतीने करणे शक्य होईल.

जिल्ह्याच्या पोलीस दलाला अत्याधुनिक सुविधांची मोठी भेट मिळाली आहे. गुन्ह्यांची उकल जलद गतीने करण्यासाठी दोन आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन (Forensic Vans) आणि कर्मचाऱ्यांची वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी ०२ नवीन पोलीस बसेस नुकत्याच सेवेत दाखल झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्याच्या पोलीसिंगला मोठा वेग मिळणार असून, कायदा आणि सुव्यवस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडण्यास मदत होईल.

फॉरेन्सिक व्हॅनमुळे तपासाला गती

वर्धा जिल्ह्याला मिळालेल्या या दोन अत्याधुनिक फरिन्सिक व्हॅनमुळे गुन्ह्यांच्या तपासाची पद्धत अधिक वैज्ञानिक आणि गतिमान होणार आहे. या व्हॅनमध्ये घटनास्थळीच (Scene of Crime) आवश्यक असलेले प्राथमिक वैज्ञानिक तपास साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेल्या लहान-लहान पुराव्यांचे जतन (Preservation) आणि संकलन (Collection) जलद गतीने व अचूकपणे करता येईल.

गुन्ह्यांची उकल सुलभः वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित तपास केल्यामुळे गुन्ह्यांची उकल करणे सोपे होईल आणि दोष सिद्धतेचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. यामुळे गुन्हेगारांवर वचक बसेल.

कर्मचारी वाहतुकीसाठी नवीन बस

पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने दोन नवीन पोलीस बस उपलब्ध झाल्या आहेत.

बंदोबस्तासाठी जलद प्रतिसादः या बसेसमुळे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करणे अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः तात्काळ बंदोबस्त (Emergency Deployment), निवडणुका, सण-उत्सवाच्या वेळी किंवा मोठ्या सभा-कार्यक्रमांदरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचणे शक्य होईल. कर्मचारी सुविधाः आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाची सोय झाल्यामुळे बंदोबस्तासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची सोय होणार आहे.

न्याय आणि दिलासाः फिर्यादींना मुद्देमाल परत

या कार्यक्रमाचा दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा भाग म्हणजे चोरीच्या गुन्ह्यात हस्तगत केलेला माल आणि चोरीस गेलेले हरवलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करणे, वर्धा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत पडलेले चोरीचे गुन्हे उपडकीस आणून आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन सोन्या चांदीचे दागीणे, रोख रक्कम, वाहने, मोबाईल एकुण कि. ४१,५७,४००रु. चा मुद्देमाल जप्त करून दिवळीचे शुभपर्वाचे औचित्य साधुन फिर्यादी यांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. तसेच वर्धा जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन हद्दीत नागरीकांचे गहाळ झालेले विविध कंपनीचे एकुण ११४ मोबाईल अंदाजे कि. १३,००,००० रु. चे नागरीकांना परत करण्यात आले.

यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांना त्यांचा गमावलेला ऐवज मालमत्ता परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव स्पष्ट दिसत होते. पोलीस दलाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे नागरिकांना त्यांचा मौल्यवान ऐवज परत मिळाला, यामुळे नागरिकांमध्ये पोलीसांबद्दलचा विश्वास अधिक वाढला आहे.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी पोलीस अधीक्षक वर्धा श्री. अनुराग जैन यांच्या नेतृत्वाखाली वर्धा पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांचे यावेळी कौतुक केले.

याप्रसंगी मा. श्री. समिर कुणावार, विधानसभा सदस्य, मा. श्री. राजेश बकाणे, विधानसभा सदस्य, मा. श्री. रामदासजी तडस, माजी खासदार, लोकसभा मतदार संघ, मा. श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा.श्री. अश्विन गेडाम, उपसंचालक, न्याय सहायक, वैज्ञानीक प्रयोगशाळा, नागपुर आणि यांसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. अनुराग जैन (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक वर्धा, मा. श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्षा श्री. पुंडलिक भटकर पोलीस उपाधीक्षक (गृह), श्री. विनोद चौधरी पोलीस निरीक्षक स्था. गु.शा, अमोल मंडलकर पोलीस निरीक्षक देवळी इत्यादी यांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे सदर कार्यक्रम हा उत्साहात पार पडला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये