ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अशोककुमार उमरे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

ठाणे येथील छेडा ऑर्केड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ( रिपाइं) बैठक 15 ऑक्टोंबर रोजी रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

सदर बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. गौतम गोसावी यांनी गडचांदूर येथील अशोककुमार उमरे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक डॉ बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य रिपाई निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. गौतम गोसावी साहेब यांनी महाराष्ट्र कार्यकारणी जाहीर केली. त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून मान. जक्कापा कांबळे यांचे एकमताने व बिनविरोध निवड करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी पुढील प्रमाणे- जाहीर करण्यात आली आहे

महाराष्ट्र राज्य खजिनदार पदी मा. गौतम पांडुरंग गोसावी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड १) विजय पंडित २) श्रीकांत नानासाहेब सावंत ३) गोकुळ पांडे ४) दीपक पाटील ५) बबनराव शिंदे ६) पंडित टोमके. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी १) मधुकर मांजरकर २) वसंत गवई ३) भाऊसाहेब डांगरे ४) अर्जुनराव खंडारे ५) रमेश शिवशरण ६) किशोर वाघमारे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी निवड १) मारुती सोनवणे २) गोपाळ रायपुरे ३) अशोककुमार उमरे ४) संघराज बिराजदार अशाप्रकारे निवड करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये