ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिनगाव जहागीरचे सरपंचपती माजी उपसभापती गजानन गंगाधर डोईफोडे जिल्हा परिषद सिनगाव जहागीर सर्कलच्या रिंगणात.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यात येत्या काही महिन्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.

देऊळगाव मही जिल्हा परिषद सर्कल आरक्षित जागा निघाली असल्यामुळे अनेकांचा कल तालुक्यातील सिनगाव जहागीर जिल्हा परिषद सर्कल मध्ये निवडणूक लढविण्याचा आहे, परंतु सिनगाव जहागीरचे सरपंचपती माजी उपसभापती गजानन गंगाधर डोईफोडे यांनी सुद्धा सिंनगाव जहागीर सर्कल मध्ये आपली कंबर कसलेली आहे मागील काही वर्षांपूर्वी सिनगाव जहागीर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये गजानन डोईफोडे यांच्या पत्नी सौ सुनीता गजानन डोईफोडे यांनी सर्वाधिक मतांनी विजय होण्याचा बहुमान त्यांच्या नावावर आहे ,सध्या त्या सिनगाव जहागीरच्या लोकनियुक्त लोकप्रिय सरपंच आहे आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्व दिग्गजांचा पराभव करून एक हाती सत्ता सिनगाव जहागीर मध्ये प्रथमच मिळवलेली आहे, ग्रामपंचायत मध्ये 11 पैकी 11 जागावर श्री संत देविदास महाराज यांचे पॅनल चे एक हाती वर्चस्व व सिनगाव जहागीर ग्राम विकास सोसायटीमध्ये 13 पैकी 12 जागांवर एक हाती वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालेले आहे ,काही वर्ष कृषी उत्पन्न बाजार समिती देऊळगाव राजा चे उपसभापती म्हणूनही त्यांनी काम बघितलेले आहे. सर्कल मधील सर्वात मोठे गाव सिनगाव जहागीर असून सुद्धा सिंनगाव जहागीर चा आत्तापर्यंत जिल्हा परिषद सदस्य झाला नाही ही खूप मोठी खंत आहे. ही खंत गजानन गंगाधर डोईफोडे यांच्या रूपाने लवकरच भरून निघणार आहे.

स्वच्छ प्रतिमा पारदर्शक काम कुठलाही भ्रष्टाचार चा आरोप नसलेले स्वच्छ प्रतिमा असलेले नेतृत्व लोकांच्या बोलण्यातून ऐकू येत आहे गजानन डोईफोडे हे स्वच्छ प्रतिमा असलेले ज्येष्ठ नेते स्व. आश्रुजी गुरुजी डोईफोडे यांचे पुतणे आहेत. देऊळगाव राजा तालुक्यात स्व आश्रुजी गुरुजी डोईफोडे यांचा सहकार क्षेत्रात त्याकाळी मोठा दबदबा होता.. खऱ्या अर्थाने सिनगावकर वासियांनी त्यांच्या उरात बाळगलेला स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे असे दिसून येत आहे. गजानन डोईफोडे यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे सिनगाव जहागीर सर्कल मधील प्रस्तापित नेत्यांच्या भुवया उंचावलेल्या आहे, गजानन डोईफोडे यांच्या जिल्हा परिषद रणांगणातील अचानक एन्ट्री मुळे प्रस्थापित नेत्यां ना मोठ्या प्रमाणात डोकेदुखी ठरू शकते प्रत्येकाच्या सुखा दुखात नेहमी हजर राहणारे व निर्भीडपणे काम करणारे सिनगाव जहागीर चे विविध कार्यकारी ग्राम विकास सोसायटीचे अध्यक्ष शालिग्राम रंगनाथ डोईफोडे यांनी सुद्धा पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचे ठरवलेले आहे.

येणाऱ्या काळात या दोन्ही भूमिपुत्रांना शिनगाव जहागीर सर्कल मधील जनता साथ देते की नाही हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये